ठाण्याच्या विद्यार्थ्यांकडून शहीद ओंबळेंच्या स्मारकाचे सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:38+5:302021-03-14T04:35:38+5:30
ठाणे : पुतळा दत्तक अभियानांतर्गत ठाणे येथील बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह मुंबई बी ग्रुपचे कमांडर नीलेश देखणे, तिन्ही ...
ठाणे : पुतळा दत्तक अभियानांतर्गत ठाणे येथील बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह मुंबई बी ग्रुपचे कमांडर नीलेश देखणे, तिन्ही विंगचे कमांडिंग ऑफिसर, मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार, महाराष्ट्र एनसीसी युनिटचे कर्नल विवेक चौधरी आदींनी मुंबईच्या २६/ ११ च्या हल्ल्यातील शहीद पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव चौपाटी येथील स्मारकाचे बुधवारी सुशोभिकरण करून परिसराची साफसफाई केली.
महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या आर्मी, नेव्ही, आणि एयर विंगद्वारे भारतातील राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्याची संपूर्ण देखभाल, सुशोभिकरण व साफसफाई करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यास अनुसरून शहीद ओंबळे, यांच्या पुतळ्यासह स्मारकाची देखभाल, साफसफाई करण्यात आली. यावेळी पुतळा स्वच्छ धुवून झाल्यावर सुशोभित करून त्यासमोर सर्वांनीच देशसेवेची शपथ घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाल्याची माहिती लेफ्टनंट बिपीन धुमाळे यांनी लोकमतला दिली.
------
फोटो आहे