coronavirus in thane: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट; ५३६४ रुग्ण ३१ मृत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:11 PM2021-04-15T22:11:57+5:302021-04-15T22:14:03+5:30

coronavirus in thane: अंबरनाथ शहरात १९२ रुग्ण शोधण्यात आले आहे. आज तीन मृत्यू झाले. या शहरात आता १४ हजार  ७५७ बाधितांसह मृतांची संख्या ३३३ नोंद आहे.

Decrease in the number of corona patients in Thane district; 5364 patients | coronavirus in thane: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट; ५३६४ रुग्ण ३१ मृत 

coronavirus in thane: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट; ५३६४ रुग्ण ३१ मृत 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या पाच हजार ३६४ रुग्ण  गुरुवारी आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत समाधानकारक घट आहे. मात्र ३१ मृतांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या चार लाख एक हजार ५४ झाली असून सहा हजार ८२५ मृतांची संख्या नोंदली आहे 

         ठाणे शहरात आज एक हजार ५०५ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत एक लाख एक हजार ८४६   रुग्ण नोंदले गेले. आज आठ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ५३३ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ५५७ रुग्ण सापडले चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरातील एकूण रुग्ण संख्या एक लाख एक हजार ७२७ झाली आहे. एक हजार ३०८ मृत्यूंची नोंद केली आहे.

     
        उल्हासनगरला १९० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात १६ हजार ७६३ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३९३आहे. भिवंडीला ६६ रुग्ण सापडले आहे. तर दोन मृत्यू झाले आहेत. येथे नऊ हजार सहा बाधितांची व ३७६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला ४०० रुग्ण आढळले असून सहा मृत्यू झाले. या शहरात आता ३६ हजार ५८० बाधितांसह ८८५ मृतांची संख्या आहे. 


            अंबरनाथ शहरात १९२ रुग्ण शोधण्यात आले आहे. आज तीन मृत्यू झाले. या शहरात आता १४ हजार  ७५७ बाधितांसह मृतांची संख्या ३३३ नोंद आहे. बदलापूरला २१६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १५ हजार ६११ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या २१६ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २०२ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २२ हजार ८२५ बाधीत झाले असून मृत्यू ६२५ नोंद झाले आहेत.

Web Title: Decrease in the number of corona patients in Thane district; 5364 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.