स्वाइनच्या लसीचा जिल्ह्यात तुटवडा
By admin | Published: July 6, 2017 06:21 AM2017-07-06T06:21:41+5:302017-07-06T06:21:41+5:30
जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने १६ जणांचा बळी गेलेला असतांनाही जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र निद्रीस्त असल्याचे पालकमंत्री एकनाथ
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने १६ जणांचा बळी गेलेला असतांनाही जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र निद्रीस्त असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिसून आले. जिल्ह्यात औषधांचा साठा भरपूर असला तरी स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याची गंभीर बाब या बैठकीत उघड झाली आहे. त्यामुळे ही लस शासनाकडून उपब्लध होईपर्यंत ती सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी खासगी एजन्सीकडून खरेदी करावी, असे निर्देश शिंदे यांनी बुधवारी एका बैठकीत दिले.
गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवासारख्या सणांचा विचार करून वेळीच याबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच स्वाइन फ्लूच नाही तर इतर साथीच्या आजारानी जिल्हा मुक्त राहवा यासाठी आरोग्य विभागास सज्ज राहण्यास त्यांनी सांगितले. स्वाइनच्या नव्या लक्षणांचा विचार करून प्रतिबंधात्मक लस विकसित केली जाते. मात्र या लसींचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण भागाने वेढलेला आहे. यामध्ये शहरी भागात स्वाइन फ्लूची मोठी लागण झाली आहे. तर ग्रामीण भागात स्वाइनचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार ४३२ जणांची स्वाइन संदर्भात तपासणी केली असून त्यामध्ये २८२ जणांना त्याची लागण झाल्याचा संशय होता. मात्र, त्यातील २४२ जणांना त्याची लागण झाल्याचे समोर आहे. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ महिलांचा समावेश आहे. हे सर्व मृत रुग्ण ठाणे जिल्ह्यातील आहेत. तसेच त्या व्यतिरिक्त जिल्हातील तिघांचा मुंबईत मृत्यू झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा १६ वर गेला आहे.
आतापर्यंत स्वाइन फ्लू मुक्त असलेल्या भिवंडी, उल्हासनगर या पालिकेच्या हद्दीतही त्याचे रुग्ण आढळले आहेत. भिवंडीत ३ तर उल्हासनगरात १ रुग्ण आढळल्याची माहिती या बैठकीत त्या-त्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. तर ग्रामीण भागात स्वाइनचे तीन रुग्ण आढळले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत हे निळजे आणि आजदे येथील असून तिसरा रुग्ण हा मुरबाड येथील असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.
तपासणी केंद्रे पुरेशी
ठाणे जिल्ह्यात १३३ तपासणी (स्क्रि निंग) केंद्रे असून सर्व पालिकांमध्ये मिळून ५९ खाटा आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. त्यातील २६ खाटा आयसीयूमध्ये, तर ६० व्हेंटिलेटर व्यवस्थेच्या आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था, मुंबईतील हाफकिन, कस्तुरबा रु ग्णालयात तसेच ठाण्यातील इन्फेक्सन या खासगी प्रयोगशाळेत संशयित रु ग्णांच्या घशातील द्रव चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मृतांमध्ये इतर आजारांचे रुग्ण
स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब तसेच आदी आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.
एका मृताचे वय पाच वर्षाचेआहे.तर १६-४५ वयोगटातील ३, ४६-६० मधील ५ आणि ६० पुढील ४ रुग्ण असल्याचेआरोग्य विभागाने सांगितले.
तसेच आतापर्यंत स्वाइनचे रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून येत होते.
यंदा मात्र ते जून महिन्यांपासून आढळून येत असून या बदलेल्या पॅटर्नचाही आरोग्य यंत्रणा अभ्यास करीत आहे.
2014
67,083
रु ग्ण तपासले - दोघे संशयास्पद. मृत्यू नाही.
2015
2,87,677
रु ग्ण तपासले - दोघे संशयास्पद. मृत्यू नाही. रु ग्ण तपासले - १ हजार ५६२ संशयास्पद. मृत्यू ५८
2016
2,70,529
रु ग्ण तपासले- १ संशयास्पद, मृत्यू नाही
2017
१ लाख ८० हजार रु ग्ण तपासले- २८० संशयास्पद, १९ मृत्यू