रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:53 PM2020-11-29T23:53:06+5:302020-11-29T23:53:14+5:30

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते.

Decreased patient rates; Fear of rising numbers after Diwali, administration warns | रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

googlenewsNext

पंकज पाटील

अंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट येणार, याची भीती सर्वांना असली तरी अंबरनाथमध्ये अद्याप रुग्णसंख्या पाहता दुसरी लाट आलेली नाही, हे उघड होत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, वाढीचे हे प्रमाण नियंत्रणात आहे. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटत आहे.

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते. कालांतराने हा आकडा अवघ्या २० ते ३० रुग्णांवर आला होता. ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १५ ते २० रुग्णांवर आला होता. 
मात्र, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या घटलेली होती. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट झालेली आहे. १० ते १५ रुग्ण दिवसाला सापडत होते. रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने हा आकडा नियंत्रणात आला. दिवाळी झाल्यावर कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती प्रशासनाला होती. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने यंत्रणाही तयार केली होती. अतिदक्षता विभागाची संख्याही वाढवली. मात्र, रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. गेल्या आठवड्याचा अहवाल पाहता दिवसाला १५ ते २५ रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे. तरीही, अंबरनाथ शहराने ३०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे. तर, बदलापूर पालिकेने २०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे.  रुग्णसंख्या घटत असल्याने पालिकेला आपली आरोग्यव्यवस्था तत्पर ठेवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याच्या कोरोनालाटेच्या प्रतीक्षेत प्रशासन सतर्क दिसत आहे.

रुग्णसंख्या नियंत्रित आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नियंत्रित आहे. सरकारच्या सतर्कतेच्या सूचनांमुळे आम्ही यंत्रणा तयार करून ठेवली आहे. याआधीही आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम केले आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ 

Web Title: Decreased patient rates; Fear of rising numbers after Diwali, administration warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.