शेलार ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:49+5:302021-05-25T04:44:49+5:30

भिवंडी : शेलार ग्रामपंचायतीने निसर्गरम्य ठिकाणी उभारलेल्या कोविड सेंटरमुळे रुग्णांचे मनोधैर्य वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. ते लवकरात लवकर ...

Dedication of Kovid Center of Shelar Gram Panchayat | शेलार ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे लोकार्पण

शेलार ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे लोकार्पण

Next

भिवंडी : शेलार ग्रामपंचायतीने निसर्गरम्य ठिकाणी उभारलेल्या कोविड सेंटरमुळे रुग्णांचे मनोधैर्य वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. ते लवकरात लवकर बरे होऊन घरी जातील, अशी प्रतिक्रिया भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड केअर सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी सोमवारी व्यक्त केली.

शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. किरण चन्ने यांच्या प्रयत्नांतून ग्रामपंचायतीने उभारलेल्या एकमेव कोविड सेंटरचे उद्घाटन सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, तहसीलदार अधिक पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अरुण भोईर, पंचायत समिती सदस्या अविता यशवंत भोईर, उपसरपंच ज्योत्स्ना भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.

किरण चन्ने यांनी ग्रामनिधीसह लोकसहभागातून अवघ्या पंधरा दिवसांत जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे कोविड सेंटर उभारले. या ठिकाणी आरोग्य सेवा मोफत दिली जाणार असून, या सेंटरचे ऑडिट केल्यानंतरही या सुसज्य सेंटरला जिल्हा प्रशासनाकडून मान्यता न मिळाल्याने हे कोविड सेंटर चर्चेत आले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळून सोमवारी या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य ॲड. सिद्धार्थ भोईर यांनी केले.

Web Title: Dedication of Kovid Center of Shelar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.