दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळेत चिमुकल्यांनी बनविले आकाशकंदील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 03:51 PM2019-10-24T15:51:56+5:302019-10-24T16:11:18+5:30

ठाण्यात दिवाळी आधी आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळा पार पडली.

Deepavali skyline and womens painting workshops made of luminaries | दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळेत चिमुकल्यांनी बनविले आकाशकंदील 

दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळेत चिमुकल्यांनी बनविले आकाशकंदील 

googlenewsNext
ठळक मुद्देआकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळेत चिमुकल्यांनी बनविले आकाशकंदील लहान मुलं मुली आणि अबालवृद्ध सहभागी स्वतः केलेले आकाशकंदील लावून दीपावली साजरी करण्यात येणारी मजा काही औरच : प्रा. श्याम धुरी

ठाणे : दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना ठाणे पूर्वेतील चिमुकल्यांच्या आपल्या कल्पकतेतून रंगीबेरंगी कंदील बनविले. पर्यावरणस्नेही कंदील बनविताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंदचे भाव होते. याचबरोबर त्यांनी आपल्या हाताने पणती रंगवून आपल्या अंगी असलेल्या कलेचे दर्शन  घडविले. 

          शिवसेवा मित्र मंडळ ठाणे, पूर्व तर्फे राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल, ठाणे पूर्व येथे, *"आता आकाशकंदील बनवा आणी पणती रंगवा घरच्या घरी"* या संकल्पनेअंतर्गत *"दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग"* या  आगळ्यावेगळ्या दीपावली विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते, या कार्यशाळेच हे पाचवं वर्ष असून यावर्षी या कार्यशाळेत वय वर्षं १० व वरील एकूण ९७ लहान मुलं मुली आणि अबालवृद्ध सहभागी झाले होते. अशा कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश सांगताना मार्गदर्शक प्रा. श्याम धुरी यांनी नमूद केलं की "या चायनीज किंवा रेडिमेड कंदीलाच्या जमान्यात स्वतः आपण आकाशकंदील बनवू शकतो हेच आपण विसरोत चाललो आहे, स्वतः केलेले आकाशकंदील लावून दीपावली साजरी करण्यात येणारी मजा काही औरच आहे". या कार्यशाळेत प्रा. श्याम धुरी यांनि उपस्थिताना दोन कलात्मक कंदील बनविण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगविण्याचे मार्गदर्शन केलं व एक कंदील व एक पणती सर्व उपस्थितांकडून बनवून घेतले,  आजच्या चायनिज व रेडिमेड कंदिलांच्या आक्रमणात या कार्यशाळेत आपण स्वतः केलेले आकाशकंदील व आपण रंगवलेल्या पणत्या घरात लावून यंदाची दीपावली साजरी करण्याचा मनस्वी आनंद मुलांसह पालकांनाही घेतला. या कार्यशाळेत भाग घेतलेल्याना ब्लू इंटरटेन्मेंट यांच्या तर्फे आयोजित फिल्मीकट्टा या तिनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात विशेष सवलत देण्यात येणार आहे अशी घोषणा यावेळी उपस्थित निर्माते एकनाथ पोवळे यांनी केली. या कार्यशाळेस नौपाडा कोपरी पाचपाखाडी प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका नम्रता पमनांनी, शिवसेना कोपरी विभागप्रमुख गिरीश राजे यांची तसेच दुरर्दशन मालिकेतील विकास थोरात, क्रीडा प्रशिक्षक मयेकर यांची विषेश उपस्थिती होती. तसेच जेष्ठ चित्रकार व रांगोळीकार महेश कोळी, योगिता नाईक,  निशा दांडेकर यांचं विशेष सहकार्य लाभलं. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुभाष परब यांनी केलं, ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे जेष्ठ सदस्य  हेमंत प्रधान, सुभाष करंगुटकर, प्रभाकर शिरवलकर आणी दीपक दांडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Deepavali skyline and womens painting workshops made of luminaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.