नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील दीपमाळा प्रज्वलित

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 31, 2023 04:01 PM2023-12-31T16:01:44+5:302023-12-31T16:01:53+5:30

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी या दीपमाळा सज्ज झाल्या आहेत.

Deepmala lit at the entrance of Thane city on New Year's Eve | नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील दीपमाळा प्रज्वलित

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील दीपमाळा प्रज्वलित

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करण्याच्या प्रकल्पात उभारण्यात आलेल्या दोन दीपमाळा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रज्वलित करण्यात आल्या आहेत.

ठाणे महानगरपालिकेने या दीपमाळांची उभारणी केली आहे. आनंदनगर आणि कोपरी सेवा रस्ता अशा दोन ठिकाणी दोन भव्य दगडी दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. दीपमाळांच्या पायथ्याचा षटकोनी व्यास ६ मीटरचा असून त्याला सहा कमानी आहेत. प्रत्येक दीपमाळेची उंची २५ मीटर एवढी आहे. त्याचे फ्रेम वर्क आरसीसीचे आहे. त्यावर, अँशलर दगडाचे प्रमाणबद्ध क्लॅडींग केले आहे.

या संपूर्ण दीपमाळांची उभारणी, आराखडा, आरसीसी बांधकाम, अँशलर दगड, विदुयत यंत्रणा आदी कामाचा या प्रकल्पात समावेश आहे. प्रत्येक दीपमाळेवर १४४ लाईटचे आर्मस् (ज्योती) आहेत. तसेच, प्रत्येक दिपस्तंभाला दोन किलो वॅटचे एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. त्याच्या मंद प्रकाशामुळे ही दीपमाळ प्रज्वलित झालेली दिसते आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी या दीपमाळा सज्ज झाल्या आहेत.

Web Title: Deepmala lit at the entrance of Thane city on New Year's Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.