न्यायालयीन आदेशानुसार बदल्या होऊन शिक्षक हजर होण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:04 PM2018-09-15T18:04:30+5:302018-09-15T18:12:43+5:30
ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ शिक्षक पालघरला हजर झाले नाही. पालघरचेही ठाण्यात आले नाही. मात्र काही शिक्षक न्यायालयात गेल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू आहे. सुमारे आठ दिवसात शिक्षकांच्या या बदल्याचा हा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे : न्यायालयीन आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्हह्यातील बदल्या एकाच वेळी झाल्या. सुमारे चार महिने होऊन ही पालघरचे शिक्षक जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये हजर झाले नाही.न्यायालयीन आदेशाचे उलंगन करणाऱ्या या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे.
ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ शिक्षक पालघरला हजर झाले नाही. पालघरचेही ठाण्यात आले नाही. मात्र काही शिक्षक न्यायालयात गेल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू आहे. सुमारे आठ दिवसात शिक्षकांच्या या बदल्याचा हा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.
शिक्षकांच्या या बदल्यांच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शिक्षण विभाग मात्र त्याविरोधात मूग गिळून आहे. यात मात्र गावखेड्यातील गरीब, कष्ठकरी, शेतकºयांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास विलंब करणाºया या शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी देखील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले.
आहे. या मनमानी शिक्षकांवर कारवाईची मागणीही त्यांच्याकडून होत आहे. शहापूर, भिवंडी आदी तालुक्यातील शिक्षक संबंधीत शाळांवर हजर न झाल्यामुळे त्यांच्याकडून न्यायालयीन आदेशाचे उलंगन झाले. या विरोधात प्रामाणीकपणे हजर झालेले शिक्षक मात्र न्यायालयाचा दरवाजा थोटावण्याच्या तयारी आहेत.
मुरबाड तालुक्यात एक शिक्षक व तीन केंद्र प्रमुख हजर झाले नाही. त्यांना या तालुक्यात यायचे नसल्यामुळे त्यांनी येण्यास नकार दिला. अंशकालीन बदल्यांच्या नावाखाली या केंद्र प्रमुखांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता मुरबाड गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांनी सांगितले. या केंद्र प्रमुखांमुळे मुरबाड पंचायत समितीच्या नियंत्रणातील टोकावडे, माळ व किशोर केंद्रांतील सुमारे ६० शाळांवरील नियंत्रणाची समस्या उद्भवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी देखील सदस्यांसह नागरिकांकडून सतत होत आहे.