आदिवासी समाजाच्या योजनांच्या अंमलबजावणीची झाडाझडती; जातीचे दाखले त्वरीत देण्याचे पाडवी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 09:49 PM2020-08-24T21:49:56+5:302020-08-24T21:50:04+5:30

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही आढावा बैठक सोमवारी पार पडली.

Delays in the implementation of tribal community schemes; Padvi orders immediate issuance of caste certificates | आदिवासी समाजाच्या योजनांच्या अंमलबजावणीची झाडाझडती; जातीचे दाखले त्वरीत देण्याचे पाडवी यांचे आदेश

आदिवासी समाजाच्या योजनांच्या अंमलबजावणीची झाडाझडती; जातीचे दाखले त्वरीत देण्याचे पाडवी यांचे आदेश

Next

ठाणे: आदिवासी  घटकासाठी अनेक योजना सरकारकडून राबविल्या जातात. त्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत व आदिवासी बांधवाना त्याचा लाभ भेटला पाहिजे. जातीचे दाखले उपलब्ध करुन द्या, शेतकर्‍यांच्या मालाचे मार्केटींग करा, त्याच्या समस्या तात्काळ सोडवा आदींसाठी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, यांनी आदिवासी विकास योजनाची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही आढावा बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी पाडवी, यांनी जिल्ह्यातील आदिवासीं योजनांच्या अंमलबजावणीची झाडाझडती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड आणि संबधित विभागाचे सर्व अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.

यावेळी आदिवासीच्या विविध योजनांचा तालुका निहाय आढावा घेतला व समस्या पाडवी, यांनी जाणून घेतल्या आहेत. जिल्ह्यातील आदिवासी भागात जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे विद्यार्थांना योजनाचा लाभ मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.त्यामुळे आदिवासी भागात जातीच्या दाखल्यासाठी कॅम आयोजीत करा असे आदेश, त्यांनी यावेळी संबधिताना जारी केले आहेत. शेती विकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टिने उपलब्ध असलेल्या साधनांचा व उर्जेचा पुरेपूर उपयोग आदिवासी शेतकऱ्यांना करुन द्या. आदिवासी भागात जे उत्पादन होते, त्याच्या उत्पादनाचे मार्केटींग करणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी अधिकार्‍यांच्या निदर्शनात आणून दिले आहे.

Web Title: Delays in the implementation of tribal community schemes; Padvi orders immediate issuance of caste certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.