ऑनलाईन महासभेतील मतदान घोटाळ्याप्रकरणी भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची सचिवांवर कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:53 PM2021-05-23T19:53:34+5:302021-05-23T19:56:08+5:30

Mira Bhayander Municipal Corporation : ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यपणे मतदान व मतमोजणी करून ठराव मंजूर करण्यात आल्याचे आक्षेप समोर आले होते. 

delegation of BJP corporators demanded action against secretary in connection with online general assembly voting scam | ऑनलाईन महासभेतील मतदान घोटाळ्याप्रकरणी भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची सचिवांवर कारवाईची मागणी 

ऑनलाईन महासभेतील मतदान घोटाळ्याप्रकरणी भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची सचिवांवर कारवाईची मागणी 

Next

मीरारोड - ऑनलाईन महासभेत ठरावावर मतदान व मतमोजणीच्या नियमांचे महापालिका सचिव यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासह झालेला बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने  केली आहे. त्यामुळे भाजपातील मेहता गटाला घरचा आहेर मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन महासभेत मतदान व मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. मतदान वेळी महासभेला जे हजर असतात त्यांनाच मतदान करता येते. तसेच प्रत्येक नगरसेवकाचे मत नोंदवले जाते. परंतु ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यपणे मतदान व मतमोजणी करून ठराव मंजूर करण्यात आल्याचे आक्षेप समोर आले होते. 

१९ मे च्या ऑनलाईन सभेत परिवहन सेवेबाबत भाजपाच्या ध्रुवकिशोर पाटील सह नगरसेविका नीला सोन्स यांनी वेगवेगळे ठराव मांडले होते. सोन्स यांच्या ठरावास भाजपाच्या काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा पाठिंबा देत भाजपातील दुफळीला हवा दिली. परंतु मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी मात्र नियमाप्रमाणे न करता त्यात गैरप्रकार केला गेल्याने पाटील यांचा ठराव मंजूर झाला असे आरोप झाले. आरोपांवर न थांबता भाजपच्या नीला सोन्स यांनी लेखी तक्रार या प्रकरणी केली आहे. 

ऑनलाईन उपस्थित नगरसेवकांची मतांची नोंदणी पूर्ण होऊन त्याचा निकाल जाहीर करण्यापूर्वीच पीठासीन अधिकारी आणि जबाबदार अधिकारी सचिव वासुदेव शिरवळकर आदी सभागृह सोडून निघून गेले. वास्तविक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सचिवांनी स्थान सोडता नये होते. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या नंतर ते सभागृहात परत आले. बऱ्याच वेळानंतर काही सदस्य ऑनलाईन नसताना सुद्धा केवळ फोन वर संपर्क साधून मतांची असंवैधानिक नोंद घेऊन मतांचा निकाल जाहीर केला असे सोन्स यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

सचिवांनी अपारदर्शक, अप्रामाणिक आणि सदस्यांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या जागी निष्पक्ष आणि जबाबदार अधिकारी नेमावा. परिवहन सेवा चालवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार महासभेला असल्याने झालेला ठराव रद्द करावा अशी मागणी सोन्स यांनी केली आहे. पत्र देताना सोन्स यांच्या सह भाजपचे नगरसेवक मदन सिंह, रवी व्यास, विनोद म्हात्रे, सुरेश खंडेलवाल, हेमा बेलानी, दौलत गजरे, पंकज पांडेय, विजय राय सह गजेंद्र रकवी आदी उपस्थित होते. महापौर ज्योत्सना हसनाळे आणि आयुक्त दिलीप ढोले यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली आहे. 

Web Title: delegation of BJP corporators demanded action against secretary in connection with online general assembly voting scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.