धमार्दाय आयुक्त येणार डोंबिवलीतील विश्वस्तांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:04 PM2018-04-03T16:04:45+5:302018-04-03T16:04:45+5:30
संस्थांच्या विश्वस्तांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ‘मुख्य धमार्दाय आयुक्त विश्वस्तां’च्या भेटीला डोंबिवलीत येणार आहेत. शनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली येथील पेंढरकर सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे.
डोंबिवली: विविध माध्यमातून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणा-या सामाजिक विश्वस्त संस्थांच्या विश्वस्तांना संस्थेचा कारभार पाहात असताना, विश्वस्त कायद्याच्या संबंधात अनेक प्रश्न भेडसावत असतात. ज्यामध्ये ट्रस्ट नोंदणी, विश्वस्त कायद्यातील झालेले बदल, चेंज रिपोर्ट, अकाऊंट, आॅडीट, डिजिटलायझेशन, स्थावर जंगम मालमत्ता संबंधित इत्यादी प्रश्न असतात. अशा संस्थांच्या विश्वस्तांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ‘मुख्य धमार्दाय आयुक्त विश्वस्तां’च्या भेटीला डोंबिवलीत येणार आहेत. शनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली येथील पेंढरकर सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, गणेशमंदिर संस्थान, लक्ष्मीनारायण संस्था आणि शबरी सेवा समिति हे कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्य धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि त्यांचे सहकारी हे ट्रस्ट संबंधातील विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात विश्वस्तांशी देखील संवाद साधला जाणार आहे. हा कार्यक्रम केवळ सामाजिक संस्थांच्या विश्वस्तांसाठीच आहे. तरी अधिकाधिक विश्वस्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
=================