१५ दिवसांत फेरीवाले हटवा अन्यथा... मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह अधिका-यांंना अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 09:20 PM2017-10-05T21:20:17+5:302017-10-05T21:20:39+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. 17 मिनिटे ही बैठक झाली.
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. 17 मिनिटे ही बैठक झाली. त्यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकांमधील फेरिवाले तातडीने हटवावेत, १५ दिवसात जर ते काम झाल नाही तर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. तसेच जे निवेदन दिले आहे त्यानूसार जर महिनाभरात प्रगति झाली नाही तर मात्र जे होइल त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल अशी तंबी ठाकरे यांनी दिली.
दुपारी २ वाजुन २१ मिनिटांनी बैठक सुरु झाली. त्यात प्रवासी संघटनांपैकी उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी, उपाध्यक्षा लता अरगडे, विश्वनाथ धात्रक, कर्जतचे पंकज ओस्वाल, पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसीचे मेहुल व्यास यांना राज ठाकरेंनी सर्वात आधी रेल्वेच्या व्यथा मांडण्यास सांगितले. त्यानूसार प्रत्येकाने स्थानकांवरील गर्दी, गैरसोयी, असुविधा, सुरक्षा व्यवस्थेचा आभाव, महिलांची आनास्था, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांची गैरसोय आदींसह रेल्वे प्रकल्पांची कूर्मगती, अधिका-यांचा संथपणा, मनमानी कारभार या विषयांवर झोड उठवण्यात आली.
आॅडिट समितीत रेल्वेने स्थानिक प्रवाशांना सामावून घेणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. त्याबद्दल संघटनांनी नाराजी व्यक्त केली. आगामी काळात तसे होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना केली. मनसेच्यावतीने शालिनी ठाकरे, माजी आमदार नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई, रेल कामगार सेनेचे जितू पाटील आदींसह अन्य पदाधिकारीदेखिल बैठक कक्षात उपस्थित होते.
त्यानंतर ठाकरे यांनी तातडीने रेल्वे अधिका-यांना जसा पत्रव्यवहार संघटना करतात तसा तुम्ही किती वेळा केला आहे. केवळ नोंदी करायच्या पुढे काही नाही असे का केले जाते. यापुढे हे सहन केले जाणार नाही हे स्पष्ट केले. महाव्यवस्थापक गुप्ता, शर्मा या दोघांनीही फेरिवाले तातडीने हटवले जातील पण जेथे स्कायवॉक आहेत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची जबाबदारी ढकलतात हे योग्य नाही हे नीदर्शनास आणले, त्यावर ठाकरेंनी यासंदर्भात बीएमसी, टीएमसी, केडीएमसी च्या आयुक्तांना, अधिका-यांशी ते बोलणार असल्याचे सांगितले. रेल्वेने त्यांची जबाबदारी पूर्ण करावी बाकी ठिकाणी आम्ही बघू असे स्पष्ट केले. सकारात्मक पद्धतीने बैठकीचा समारोप झालेला असला तरीही आगामी काळात सहकार्य न मिळाल्यास माझी जबाबदारी नाही, रेल्वेची असेल असे सांगत ठाकरेंनी बैठक समाप्त केली.