घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवा - मनविसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:28 PM2018-04-10T16:28:05+5:302018-04-10T16:28:05+5:30

घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर होत असलेल्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली आहे.

Delete unauthorized parking on Service Road on Ghodbunder Road - MNVS's demand | घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवा - मनविसेची मागणी

घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवा - मनविसेची मागणी

Next
ठळक मुद्देअनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मनविसेची मागणी आमच्या स्टाईलने ही समस्या सोडविली जाईल - मनविसेया वाहतूक कोंडीचा त्रास सामान्यांना

ठाणे: घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर अनधिकृत वाहन पार्किंगच्या विळख्यात हा रस्ता अडकला आहे. महापालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेने हा रस्ता पार्किंगमुक्त न केल्यास आमच्या स्टाईलने ही समस्या सोडविली जाईल असा इशारा मनविसेने दिला आहे.
        घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहन पार्किंग केली जाते. आता हळूहळू फेरीवाले देखील ठाण मांडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. या समस्येकडे मात्र महानगरपालिका आणि त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष असून या बेशिस्त वाहन पार्किंगवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक कोंडीचा त्रास समान्यांनी का सहन करायचा? सर्व्हिस रस्ता हॉटेल्स, शोरुम आणि मॉलसाठीच आहे का? या बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न मनसेने उपस्थित केले आहे. या अनधिकृत पार्किंगवर कारवाई व्हावी आणि हा रस्ता पार्किंगमुक्त व्हावा अन्यथा मनविसे आंदोलनाचा बडगा उचलेल असा इशारा ठाणे उपशहर अध्यक्ष किरण पाटील यांनी दिला आहे. २०१५ साली हा प्रश्न मनविसेने उपस्थित केला होता. त्यानंतर कारवाईचा दिखावा करण्यात आला. आता परिस्थिती जैसे थे आहे असे पाटील यांनी सांगितले. कापुरबावडी ते ओवळा पर्यंत असलेला सर्व्हिस रोड हा अनधिकृत पार्किंगचा अड्डाच बनला आहे असा आरोप मनविसेने केला आहे. संध्याकाळी या रस्त्यावरुन जाणे कठिण आहे. त्यामुळे ही पार्किंग ताबडतोब हटविण्याची मागणी मनविसेने केली आहे. मंगळवारी या संदर्भात मानपाडा प्रभाग समिती आणि वाहतूक नियंत्रण शाखेला मनविसेने निवेदन दिले आहे.

 

Web Title: Delete unauthorized parking on Service Road on Ghodbunder Road - MNVS's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.