वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था रुग्णालयाजवळच करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:52 AM2020-04-29T02:52:31+5:302020-04-29T02:52:47+5:30

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सेवा देणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयाजवळच त्यांची निवास व्यवस्था केल्यास त्यांच्या परिवारासह सहवासातील लोकांचा बचाव करणे शक्य होईल, असा सूर उमटत आहे.

Demand for accommodation of medical staff near the hospital | वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था रुग्णालयाजवळच करण्याची मागणी

वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था रुग्णालयाजवळच करण्याची मागणी

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि बºयाच झोपडपट्ट्या आजही कोरोनापासून लांब आहेत. त्यांना या संसर्गापासून कायम दूर ठेवण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सेवा देणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयाजवळच त्यांची निवास व्यवस्था केल्यास त्यांच्या परिवारासह सहवासातील लोकांचा बचाव करणे शक्य होईल, असा सूर उमटत आहे.
मुंबई, ठाणे आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाºयांना घेऊन सकाळी - संध्याकाळी शेकडो बस कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, टिटवाळा आदी ठिकाणी येजा करीत आहेत. आरोग्य सेवा बजावत असलेले कोरोना योद्धे हे चाळी, झोपडपट्टी भाग किंवा गावखेड्यांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना आणि त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये, या भीतीने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांची निवास व्यवस्था कार्यरत असलेल्या ठिकाणच्या जवळपास होण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना विचारणा केली असता, राज्य शासनाला याबाबत विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>इंग्रजांच्या काळात होणारी नगररचना व स्वातंत्र्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरविणाºया व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्थेचे नियोजन हा पूर्वीच्या नगररचना योजनेतील महत्त्वाचा भाग असे. त्यादृष्टीने जे क्वार्टर्स पुरविले जात, ते आजही आपण अनेक ठिकाणी पाहू शकतो. उदा. रेल्वे क्वार्टर्स, महापालिका कर्मचारी क्वार्टर्स, पोलीस वसाहती, सिव्हिल व मुंबई महापालिका रु ग्णालयातील क्वार्टर्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवण्यात खंड पडत नाही. त्यांना खडतर प्रवास करून कार्यालय वा इस्पितळ गाठावे लागते नाही. यापुढे नगररचनेत या महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणे हा महत्त्वाचा धडा आपण शिकायला हवा.
- उन्मेश बागवे, ठाणे मतदाता जागरण अभियान
>वैद्यकीय चमू सातत्याने रुग्णांच्या संपर्कात आहेत. या महामारीत जीव धोक्यात घालून सेवा बजावणाºया या योद्ध्यांसाठी ते ज्या रुग्णालयात सेवा करतात, त्या परिसरात निवास व्यवस्था केल्यास त्यांची प्रवासाच्या त्रासातून सुटका होईल. शिवाय त्यांचे कुटुंब आणि परिसर सुरक्षित राहील.
- अ‍ॅड. राजकुमार पाटील, मुरबाड

Web Title: Demand for accommodation of medical staff near the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.