केडीएमसी कामगारांची वैद्यकीय बिले मंजूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:57+5:302021-06-09T04:49:57+5:30

कल्याण : कोरोना काळात कोराेनाची लागण झालेल्या कामगारांना सरकारी रुग्णालयात बेड न मिळाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. या ...

Demand for approval of medical bills of KDMC workers | केडीएमसी कामगारांची वैद्यकीय बिले मंजूर करण्याची मागणी

केडीएमसी कामगारांची वैद्यकीय बिले मंजूर करण्याची मागणी

Next

कल्याण : कोरोना काळात कोराेनाची लागण झालेल्या कामगारांना सरकारी रुग्णालयात बेड न मिळाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. या कामगारांची वैद्यकीय बिले महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असून, ती तातडीने मंजूर करण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कोरोना काळात महापालिका कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून कामावर हजर होते. कोरोना काळात दुसरी लाट भयावह होती. यावेळी बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात होती. सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयातही बेड नव्हते. सरकारी रुग्णालयात बेड न मिळाल्याने महापालिकेच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यांनी वैद्यकीय उपचाराची बिले अद्याप मंजूर केली नसल्याची बाब कामगार सेनेने उपस्थित केली आहे. महापालिकेकडे अनेक विभाग आहेत. वैद्यकीय बिले प्रलंबित अद्याप आलेली नाहीत. आल्यास ती तातडीने मार्गी लावली जातील, असे प्रशासनाने याबाबत स्पष्ट केले आहे.

---------------------------------

Web Title: Demand for approval of medical bills of KDMC workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.