कोपरी पुलाचे काम सेनादलाकडे सोपविण्याची भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:45 PM2018-08-31T16:45:12+5:302018-08-31T16:47:10+5:30

कोपरी पुलाचे काम वेगाने करण्यासाठी ते काम सेनादलाकडे सोपविण्यात यावे तसेच वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे शहरात विविध उपाय योजना करण्यात याव्यात, अशा काही मागण्यांचे निवेदन भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

Demand of BJP corporator Manohar Dumbre to hand over Kopri bridge to Army | कोपरी पुलाचे काम सेनादलाकडे सोपविण्याची भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोपरी पुलाचे काम सेनादलाकडे सोपविण्याची भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next
ठळक मुद्दे२३ सप्टेंबरनंतरही मुलुंड टोलनाक्यावर हलक्या वाहनांना सवलत द्यावीसाकेत ते गायमुख बायपास रस्त्याला वेग देण्याची मागणी

ठाणे - नियोजित कोपरी पूलाचे काम वेगाने होण्यासाठी पुलाचे काम सेनादलाकडे सोपवावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मुलूंड टोल नाक्यावरु न सकाळी व सायंकाळी हलक्या वाहनांना सूट द्यावी, शहरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी साकेत-गायमुख बायपास रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
                 ठाणे शहराबरोबरच घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. तर काही संघटना व फेडरेशनने आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या पाशर््वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गुरु वारी भेट घेतली. यावेळी पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी येथे नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र, त्याला दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील एलफीस्टन रोड येथील पुलाच्या धर्तीवर कोपरी पूलाचे कामही लष्कराकडे सोपवावे अशी मुख्य मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने तूर्त २३ सप्टेंबरपर्यंत मुलूंड व ऐरोली टोल नाक्यावरु न जाणाऱ्या हलक्या वाहनांना सूट दिली आहे. परंतु, २३ सप्टेंबरनंतर पुन्हा वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कोपरी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दररोज सकाळी ६ ते १० पर्यंत आणि सायंकाळी ६ ते १० पर्यंत लहान वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन, ठाणे महापालिकेने साकेत ते गायमुख हा बायपास रस्ता मंजूर केला. त्यासंदर्भात सर्व परवानगी मिळालेली आहे. मात्र, त्याबाबत अजूनही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू केल्यास वाहनचालकांना दिलासा मिळू शकेल. शहरातील वाहतूककोंडीतून कमी होण्यासाठी तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी नाक्यावरील सिग्नलवर ग्रेड सेपरेटर टाकावेत. मेट्रोच्या कामामुळे होणारी घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सर्व्हीस रस्ता मोकळा करावा, ठाणे शहरात दिवसा जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करावी, आदी उपाययोजना कराव्यात अशा मागण्यासुध्दा त्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, ठाणे शहरातील नागरीकांना वाहतूककोंडीतून दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ठाणेकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सर्व सरकारी यंत्रणांची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर डुंबरे यांना दिले.


 

Web Title: Demand of BJP corporator Manohar Dumbre to hand over Kopri bridge to Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.