भिवंडीतील नागरीकांच्या पिण्याचे पाणी चोरतात डार्इंगवाले फौजदारी गुन्हे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:17 PM2018-04-11T13:17:00+5:302018-04-11T13:17:00+5:30
भिवंडी : शहरातील कापडावर व धाग्यांवर प्रक्रीया करणाऱ्या अनेक डार्इंग व सायझिंगमध्ये सर्रासपणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चोरी केली जात असुन गेल्या आठवड्यात पालिकेने केलेल्या कारवाईत केवळ ९ डार्इंगमधील २६ जोडण्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र सायझिंगवर कारवाई करण्यात आली नाही. यावर ठोस उपाययोजना करून शहरातील पाणी माफीया, डार्इंग व सायझिंग मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनमानसांतून केली जात आहे.
शहरात आणि परिसरांत शेकडोच्या संख्येने डार्इंग व सायझिंग असुन या त्यामध्ये धाग्यांवर व कापडावर प्रक्रीया करण्यासाठी लाखो लिटर पाणी लागते. हे पाणी कोठून उपलब्ध होत आहे,या बाबत पालिका प्रशासनाने कोणत्याही डार्इंगला जाब विचारला नाही. तर काही डार्इंग मालकांनी आपल्या डार्इंग परिसरांत बोअरवेल व विहिर खोदून तेथील पाणी कापड प्रक्रीयेसाठी वापरण्यात येत असल्याचे सांगीतले जाते.परंतू दररोज लागणारे लाखो लिटर पाणी या साधनांमधून उपलब्ध होऊ शकत नाही.तर डार्इंगना अनाधिकृत पाणी पुरवठा अथवा पाणी माफीयांच्या टॅन्कर मधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या वर्षापासून शहरात टॅन्करमधून पाणी पुरवठा करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे बºयाच डार्इंग व सायझिंगला नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे,अशी माहिती डार्इंग मधील अधिकारी व कर्मचारी देऊ लागले आहेत. यासाठी पालिकेतील काही अधिकाºयांनी नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत जलवाहिनीची विशिष्ट पध्दतीने पाणी पुरवठ्याची योजना राबविली असुन त्याव्दारे डार्इंगला पाणी पुरवठा करून नागरिकांना वेठीस धरले आहे,अशी माहिती मिळत आहे. यासाठी पालिकेच्या जलवाहिनी व त्यामधून होणाºया पाण्याचे वितरण याचा तपशील वरिष्ठ अधिकारी व शासकीय जल अभियंत्यांकडून तपासले तरच पाणी पुरवठ्यातील सत्य बाहेर येईल. काही राजकीय पुढारी व पालिकेचे अधिकारी यांनी पाणीपुरवठ्यात गेल्या वीस वर्षापासून केलेल्या बदलामुळे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा आराखडा पालिकेत प्रसिध्द करीत नाही.
या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे त्रस्त महिलांसह नागरिकांनी तक्रारी केल्या असता त्यांनी खोका कंपाऊण्डमधील निलेश डार्इंग,रूंगठा डार्इंग,मधू डाईंग,महेश डार्इंग,शंकर डाइंग, कैलास डार्इंग,चूर डाईंग आदि डार्इंगमध्ये घेतलेल्या अनाधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई केली. या कारवाईत एकूण २६ बोअरवेल व विहिरीद्वारे पाणी घेणाºयांवर कारवाई कारण्यात आली.या कारवाईत अनाधिकृत नळ कनेक्शन तसेच विहिर व बोअरवेलमधून घेण्यात आलेले पी व्ही. व्ही पाईप लाईन तोडले असून एक अनाधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यात आली. नागरिकांचे पाणी चोरणाºया डार्इंग व सायझिंगवर यापुढे अशीच कारवाई सुरू राहील अशी माहिती महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले.मात्र चोरून पाणी वापरणाºया डार्इंग मालक व चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने नगरसेवकामध्ये नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अधिकाºयांच्या व काही राजकीय पक्षांच्या अशिर्वादाने कापडडार्इंग व सायझिंगमध्ये पाणी चोरी करण्याचे प्रकार सुरळीतपणे सुरू आहेत.त्यामुळे करदात्या नागरिकांना नियमीत व मुबलक पाणी मिळत नसल्याने शहरात कृत्रीम पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.