गुंजाळ हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी

By admin | Published: January 5, 2016 01:52 AM2016-01-05T01:52:51+5:302016-01-05T01:52:51+5:30

अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक, जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी

The demand for entrusting the murder of the murder to the CID | गुंजाळ हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी

गुंजाळ हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक, जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. यामुळे त्यांना त्वरित गजाआड करावे व त्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्तांना दिले आहे.
गुंजाळ यांची २५ डिसेंबर रोजी मोरिवली परिसरात दिवसाढवळ्या इनोव्हा कार व मोटारसायकलवरून आलेल्या टोळीने निर्घृणपणे हत्या केली होती. चार आरोपी शरण आल्यावर उर्वरित मारेकऱ्यांना शोधून काढण्यास अंबरनाथ पोलीस अपयशी ठरत असल्याने जळगाव व चाळीसगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन गुंजाळ यांच्या मारेकऱ्यांसंदर्भात माहिती घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for entrusting the murder of the murder to the CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.