नागपंचमी दिवशी साप घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By धीरज परब | Published: August 19, 2023 01:02 PM2023-08-19T13:02:48+5:302023-08-19T13:03:06+5:30
नागपंचमी निमित्त लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नाग आदी सर्प घेऊन काही व्यावसायिक पैसे कमावण्यासाठी फिरत असतात .
मीरारोड - नागपंचमी निमित्त लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नाग आदी सर्प घेऊन काही व्यावसायिक पैसे कमावण्यासाठी फिरत असतात . साप घेऊन कोणी आढळल्यास त्यांच्यावर वन्य प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे सचिन जांभळे यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तां कडे केली आहे .
पोलीस आयुक्तलय क्षेत्रातील बाजार पठेत, मंदिर परिसरात नाग पंचमी या दिवशी जिवंत साप आणले जाऊ शकतात, असे घडल्यास त्या व्यक्ती वर वन्य प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत पोलीस विभागाने कार्यवाही करावी.
तसेच नागपंचमी सणाचे औचित्य साधून मीरा भाईंदर महानगरपालिकेने सर्प आणि सर्प दंश बाबत जनजागृती करावी. भारतरत्न भीमसेन जोशी आणि भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात सर्प दंशावर उपचार केले जातात या बाबत सुद्धा लोकां पर्यंत माहिती देण्याची गरज जांभळे यांनी बोलून दाखवली .