गुरवली, चामटोली रेल्वेस्थानकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 01:28 AM2019-06-28T01:28:16+5:302019-06-28T01:28:47+5:30

मध्य रेल्वेवर गुरवली व चामटोली रेल्वेस्थानके उभारावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

Demand for Gurvali, Chamoli railway stations | गुरवली, चामटोली रेल्वेस्थानकांची मागणी

गुरवली, चामटोली रेल्वेस्थानकांची मागणी

Next

भिवंडी - मध्य रेल्वेवर गुरवली व चामटोली रेल्वेस्थानके उभारावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून टिटवाळा ते खडवलीदरम्यान गुरवली तसेच बदलापूर ते वांगणीदरम्यान चामटोली रेल्वेस्थानक उभारण्याची मागणी केली जात आहे. टिटवाळा ते खडवली व बदलापूर ते वांगणीदरम्यान अंतर जास्त असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात. त्याचबरोबर या भागातील वाढत्या नागरिकीकरणामुळे रेल्वेस्थानक उभारण्याची आवश्यकता आहे, याकडे खासदार पाटील यांनी लक्ष वेधले.

गुरवलीतील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी आपण ग्रामस्थांची समजूत काढून रेल्वेस्थानकासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. दोन्ही रेल्वेस्थानकांमुळे परिसराचा विकास होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही रेल्वेस्थानकांना मंजुरी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली. यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नाने उंबरमाळी व तानशेत रेल्वेस्थानकांना अधिकृत दर्जा मिळाला होता. त्याचबरोबर अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान नव्या चिखलोली रेल्वेस्थानकाला मंजुरी मिळाली होती. उंबरमाळी व तानशेत स्थानकांची कामे प्रगतीपथावर असून, चिखलोली स्थानकाचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Demand for Gurvali, Chamoli railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.