घरकूल योजनेच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:11+5:302021-03-13T05:14:11+5:30
अनगाव : भिवंडी तालुक्यातील पारिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये शबरी आदिवासी घरकूल योजनेत सावळागोंधळ झाला असून पंचायतीच्या सदस्यांनीच आपल्या कुटुंबीयांना ...
अनगाव : भिवंडी तालुक्यातील पारिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये शबरी आदिवासी घरकूल योजनेत सावळागोंधळ झाला असून पंचायतीच्या सदस्यांनीच आपल्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिल्याने त्यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ महेंद्र निरगुडा यांनी आदिवासी विकास विभागाचे सचिव व विभागीय कोकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकारच्या आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीमधील ज्या नागरिकांना घर नाही त्यांच्यासाठी ‘शबरी आदिवासी घरकूल योजना’ राबविण्यात येते. परंतु पारिवली पंचायतीमध्ये या योजनेचा लाभ विद्यमान सरपंच अनिता भुयाल यांनी पतीला तर सदस्य महेश निरगुडा यांनी वडिलांना दिला आहे. त्याकरिता दिली जाणारी एक लाख २० हजारांची रक्कम घेऊन घरे बांधली नाहीत, असा आरोप तक्रारदार निरगुडा यांनी केला असून, या कारभाराची चौकशी करून यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.