कल्याण आरटीओच्या संगणकीय ऑनलाईन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 06:21 PM2020-08-28T18:21:25+5:302020-08-28T18:22:49+5:30

संगणक खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व जनतेला होणारा नाहक त्रास व लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Demand for probe into Kalyan RTO's computer online scam | कल्याण आरटीओच्या संगणकीय ऑनलाईन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

कल्याण आरटीओच्या संगणकीय ऑनलाईन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

Next

डोंबिवली - कल्याण आरटीओ कार्यालयातील या ऑनलाईन संगणक घोटाळ्याची कसून चौकशी सुरू करून संबंधित संगणक खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व जनतेला होणारा नाहक त्रास व लूट थांबवावी, अशी मागणी परिवहन मंत्री व आयुक्त यांच्याकडे डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

युनियनचे अध्यक्ष कळू कोमास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागातील आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचार बंद व्हावा व जनतेची लूट थांबावी यासाठी महाराष्ट्र शासनाने गाजावाजा करून सर्व आरटीओ कार्यालयातील कामकाज संगणकीय पद्धतीने ऑनलाईन सुरू केला आहे. मात्र कल्याण आरटीओ कार्यालयात लॉकडाऊन ओपन केल्यापासून ऑनलाईन कामकाजात भ्रष्टाचार सुरू झाला आहे. लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, लायसन्स नुतनीकरण, रिक्षा पासिंग याची स्लाँट बुकिंगची तारीख कल्याण आरटीओमध्ये ३ ते ४ महिन्यांपर्यंत मिळत नाही. त्यामुळे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. 

परंतु जे खाजगी दलाल व काही ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक "जास्त जी फॉर्म" म्हणजे वाढीव लाच देतात त्यांना सहज व लवकरची तारीख मिळत आहे. अशाप्रकारे कल्याण आरटीओ कार्यालयात अनुभव येत आहे. कारण इतरांना स्लाँट उपलब्ध नाही असे दाखवण्यात येत आहे. कधीकधी रात्री उशिरा अचानकपणे स्लाँट ओपन दिसतो. त्यावेळी अर्जदारांकडून ओटीपी घेता येत नाही. मात्र ठाणे, पनवेल,नवी मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात १४ सप्टेंबर २०२० पासून स्लाँट ओपन असल्याचे दिसून येत आहे. परंतु कल्याण आरटीओ मधे नोव्हेंबर २०२० पर्यंत स्लाँट ओपन दिसत नाही.

कल्याण आरटीओमधील संगणकीय ऑनलाईन घोटाळा आहे हे सिद्धच होत आहे. परंतु कल्याण आरटीओमधील अधिकारी व कर्मचारी यांचे काही खास दलाल व काही ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांचे लाच देण्याघेण्याचे प्रत्येक कामाचे दर ठरलेले आहेत. हा दर वाढविण्यासाठी हा ऑनलाईन संगणक घोटाळा सुरू केला आहे का? त्यामूळे याबाबत सखोल चौकशी व्हावी असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं

"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

Web Title: Demand for probe into Kalyan RTO's computer online scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.