चित्रपटनिर्मितीसाठी २० लाखांच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 09:22 PM2020-02-23T21:22:36+5:302020-02-23T21:39:59+5:30
चित्रपट निर्मितीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी मागणी मागणाऱ्या समीर महाजन याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी करुन त्यातील एक लाखांची खंडणी उकळणा-या समीर महाजन (४७) याला अलिकडेच नौपाडा पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याचा दुसरा साथीदार बंटी सिंग हा चित्रपट निर्माता असून तो पोलिसांना हुलकावणी देत आहे. तो गुजराथमध्ये पसार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्टÑ या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाºया बंटीने या खंडणी प्रकरणामध्ये समीरला साथ दिल्याचा आरोप आहे. बंटी आणि नौपाड्यातील बांधकाम व्यावसायिक हसमुख सुरजी शाह (५०, रा. विष्णुनगर ,ठाणे) यांची ओळख एका जीममध्ये झाली होती. तुम्ही समीरला २० लाख रुपये देण्याऐवजी मला हे पैसे द्या. त्याद्वारे मला चित्रपटाची निर्मिती करता येईल, असा दावा बंटीने हसमुख यांच्याकडे केला होता. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही पैशांची मागणी केली होती. दरम्यान, शाह यांच्याकडे समीर महाजन यानेही २० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. शाह यांचे विष्णूनगर येथील एकदंत हाऊसिंग सोसायटीमध्ये तळमजल्यावर कार्यालय आहे. ते अनधिकृत असून त्याबाबत ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात त्यांच्याविरुद्ध तक्र ार अर्ज करून अतिक्र मण विभागामार्फत कारवाई करेन, अशी समीरने धमकी दिली होती. मार्च २०१९ ते ५ फेब्रुवारी २०२० या काळात हा प्रकार सुरु होता. कारवाई नको असल्यास खंडणीची रक्कम द्यावी लागेल. खंडणी दिली नाहीतर तुला संपवतो. तसेच तुझ्या कुटूंबियांना खोटया केसमध्ये अडकवितो, असेही त्यांना धमकावले होते. शाह यांनी याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने २० लाखांमधील एक लाखांची रक्कम घेण्यासाठी शाह यांच्या कार्यालयात आलेल्या समीरला १३ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ अटक केली. त्याच्या दुसºया साथीदाराचाही शोध घेण्यासाठी एका पथकाची निर्मिती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. त्याला लवकरच पकडण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.