ठाण्यातील व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात, निर्बंध शिथील करण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:46 PM2021-04-06T14:46:35+5:302021-04-06T14:53:51+5:30
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार वाढल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात अनेकांना लाखो रु पयांचे कर्ज देखील झाल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. अनलॉक नंतर सर्व व्यवहार मुळपदावर येत असतांना व्यापारी पुन्हा एकदा उद्योग धंद्याला लागले
ठाणे - राज्य शासनाच्या वतीने केवळ शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले असतानांच सोमवारी अचानक ठाणो महापालिकेने संपूर्ण लॉकडाऊनची ची घोषणा केल्याने व्यापा:यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील व्यापा:यांनी तसेच नौपाडा भागातील व्यापा-यांनी याचा निषेध करीत रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. तसेच र्निबध शिथील करण्याची मागणी देखील केली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार वाढल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात अनेकांना लाखो रु पयांचे कर्ज देखील झाल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. अनलॉक नंतर सर्व व्यवहार मुळपदावर येत असतांना व्यापारी पुन्हा एकदा उद्योग धंद्याला लागले आणि पुन्हा एकदा कोरोनाने जोरदार धडक देत सर्व व्यवहार ठप्प केले. मंगळवारी ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर उदरिनर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असून आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एक सांगतात आणि स्थानिक प्रशासन वेगळेच करतात याचा अर्थ काय, असा परखड सवाल देखील त्यांनी विचारला आहे. सरकारने आखून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करायला तयार असताना आमच्यावरच हा अन्याय का असे देखील यार व्यापा:यांचे म्हणणो आहे. अनेक शहरांमध्ये जसे व्यापारी संघटनांनी विरोधात बंड पुकारले आहे. तसाच विचार सर्व लहानमोठ्या व्यापा-यांच्या डोक्यात घोळत असल्याने येत्या काळात तोडगा निघाला नाही तर कठोर पाऊल उचलू असा इशारा देखील व्यापाऱ्यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान या संदर्भात आखण्यात आलेले र्निबध शिथील करण्यात यावे, किंवा पी वन, पी २ आखणी करुन त्यानुसार बाजारपेठ खुली करण्यात यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे. किंवा वेळा ठरवून त्यानुसार दुकाने उघडी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे.
राज्य शासनाने घातलेले नियम आणि महापालिकेने घातलेले नियम यात फरक दिसत आहे. त्यामुळे एकच नियम लागू करण्यात यावा, तसेच र्निबध देखील शिथील करण्यात यावे व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टेसींग तसेच इतर सर्व नियमांचे पालन केले जाईल. परंतु दुकाने उघडी करण्यास परवानगी द्यावी.
- मितेश शहा (व्यापारी )