उसाटणेत दुसरी जागा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:10+5:302021-08-25T04:45:10+5:30

उल्हासनगर : महापालिकेच्या उसाटणे गावाच्या हद्दीतील डम्पिंगबाबत आयुक्त दयानिधी यांनी बोलाविलेल्या बैठकीला गावकऱ्यांसह आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड उपस्थित ...

Demand for second place in Usatane | उसाटणेत दुसरी जागा देण्याची मागणी

उसाटणेत दुसरी जागा देण्याची मागणी

Next

उल्हासनगर : महापालिकेच्या उसाटणे गावाच्या हद्दीतील डम्पिंगबाबत आयुक्त दयानिधी यांनी बोलाविलेल्या बैठकीला गावकऱ्यांसह आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड उपस्थित होते. आयुक्तांच्या पाहणीनंतर सर्वानुमते पालकमंत्री व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

उल्हासनगरातील डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शासनाने उसाटणे हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला दिली. मात्र जागेची मोजणी व संरक्षण भिंत उभारण्यासाठी गेलेल्या महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या व आमदार गायकवाड यांच्या विरोधामुळे माघारी परतावे लागले. सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन त्याचे खापर आयुक्तांच्या अकार्यक्षमतेवर फोडले. दरम्यान, आयुक्तांनी गावकरी व आमदार गायकवाड यांना मंगळवारी दुपारी बैठकीला बोलाविले होते. या वेळी डम्पिंग ग्राउंडची जागा शाळेजवळ असल्याने, त्या जागेऐवजी त्यापुढील जागा शासनाने द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

महापालिका आयुक्त डॉ. दयानिधी यांनी स्वतः उसाटणे गावाच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंडच्या जागेची पाहणी करावी. त्यानंतर पालकमंत्र्यांसह संबंधितांची बैठक घेऊन शाळेपासून लांब जागा डम्पिंग ग्राउंडसाठी शासनाने महापालिकेला द्यावी, असे गायकवाड म्हणाले. बैठकीला उपमहापौर भगवान भालेराव, कुमार आयलानी, उपायुक्त मदन सोंडे, मनीष हिवरे, विनोद केणी आदी उपस्थित होते. शहराचे आमदार कुमार आयलानी यांनी डम्पिंग ग्राउंडच्या बैठकीत शहराच्या हितार्थ बाजू मांडायला हवी होती, अशी टीका आयलानींवर होत आहे.

..............

वाचली.

Web Title: Demand for second place in Usatane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.