ठामपाचा १८ ऑक्टोबरला लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:05+5:302021-09-21T04:46:05+5:30
ठाणे : नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने व्हावा, यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या ...
ठाणे : नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने व्हावा, यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे १८ ऑक्टोबरला होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी १५ दिवस आधी ४ ऑक्टोबरपूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार १५ दिवस आधी निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने त्यात्या परिमंडळ कार्यालयात सादर करावीत.
अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. लोकशाही दिनामध्ये अन्य व्यक्तिंमार्फत केलेली तक्रार स्वीकारली जाणार नाही. तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येण्याची आवश्यकता नसल्याचेही पालिकेने म्हटले आहे.
……….......................