विनयभंग आणि मारहाणीच्या घटनेनंतर डिस्को पब-हुक्का पार्लर वर ठोस कारवाईसह बेकायदा बांधकाम तोडा
By धीरज परब | Published: May 27, 2024 12:15 PM2024-05-27T12:15:22+5:302024-05-27T12:16:11+5:30
येथील बेकायदा बांधकाम वर कारवाईची मागणी होत आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या काशीमीरा नाका जवळील ए आर रेसिडेन्सी हॉटेल येथे असलेल्या गेट सेट नाईट ह्या डिस्को पब - बार कम हुक्का पार्लर मध्ये एका तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीच्या घटने नंतर पोलिसांनी येथील हुक्का पार्लरवर कारवाई चालवली आहे . परंतु सदर बारचे परवाने रद्द करण्या पासून ठोस कारवाई करा तसेच येथील बेकायदा बांधकाम वर कारवाईची मागणी होत आहे .
काशीमीरा नाका जवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या ह्या जीएसटी पब डिस्को बार मध्ये सर्रास हुक्का चालतो . तसेच पहाटे पर्यंत येथे धुडगूस चालतो .tr एका राजकीय पक्षातील दलाल प्रवृत्ती आणि पोलिसांच्या संगनमताने ह्या अवैध प्रकार चालणाऱ्या पब वर कारवाई होत नसल्याचे आरोप केले जातात .
त्यातच काही दिवसां पूर्वी सदर पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्या प्रकरणी पबचा बाउन्सर आणि एका महिले विरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून टीकेची झोड आणि आरोपांच्या फैरी झडू लागल्याने पोलिसांनी धाड टाकून बेकायदा हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी सामान जप्त करत मालक अक्षयकुमार प्रवीणकुमार जैन रा. भाईंदर याच्यासह व्यवस्थापक मिथुन भवरलाल जैन, अमित मिश्रा , जतीन आणि आफास विरुद्ध ग्राहकांना हुक्का पिण्यास उपलब्ध केल्याप्रकरणी तसेच त्याचे सामान बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
त्या नंतर देखील स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदा हुक्का आदी सुरूच असल्याचे आरोप झाल्याने अमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट -१ यांनी संयुक्त कारवाई हुक्का पुरवणारे १ मॅनेजर व ३ वेटर तसेच बार चालक, मालक यांच्या विरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला .
या वरून स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झालेच शिवाय ह्या पब - बार मधिल बेकायदा बांधकाम वा अंतर्गत बेकायदा बदल प्रकरणी कारवाई महापालिका देखील करत नसल्याचे आरोप होत आहेत .