उल्हासनगरात अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई
By सदानंद नाईक | Published: March 27, 2023 07:13 PM2023-03-27T19:13:03+5:302023-03-27T19:13:13+5:30
अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ साई बाबा मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर बांधण्यात आलेल्या ढाबा व दुकानावर महापालिका अतिक्रमण विभागाने सोमवारी दुपारी पाडकाम कारवाई केली. अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ बदलापूर ते कल्याण मुख्य रास्त लगत व साई बाबा मंदिर जवळ ढाबा व काही दुकानाचे अवैध बांधकाम झाल्याची माहिती अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांना मिळाली. शिंपी यांनी अतिक्रमण पथकासह सोमवारी दुपारी घटनास्थळी जाऊन अवैध बांधकाम जमीनदोस्त केले. शहरातील शासकीय भूखंड, महापालिका शौचालय व खुल्या जागेवर अवैध बांधकामाचा बोलबाला असून एका वर्षात ४ पैकी ३ पालिकेचे प्रभाग अधिकारी सहकारी कर्मचाऱ्या सोबत लाच घेताना रंगेहात सापडले. तर गेल्याच महिन्यात महापालिका शौचालय जागेवर झालेले अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई करून, बांधकाम करणाऱ्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शहरातील अवैध बांधकाम प्रकरणी आयुक्त अजीज शेख यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, अवैध बांधकामावर अंकुश आला. अवैध बांधकामाची माहिती दिल्यास त्यावर पाडकाम कारवाई करण्याचे संकेत अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली. आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या भूमिकेने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.