मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
By सुरेश लोखंडे | Published: September 18, 2023 04:18 PM2023-09-18T16:18:54+5:302023-09-18T16:19:39+5:30
आंदाेलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
ठाणे : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या हालचालींना तीव्र विरोध करण्यासाठी व राज्यात जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी येथील ओबीसी जनमोर्चाने नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी निदर्शने केली. या आंदाेलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या कार्यकर्त्यानी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली. यावेळी ठाण्यातील आगरी, कोळी, कुणबी, भंडारी समाजातील कार्यकर्ते या धरणे आंदाेलनात सहभागी हाेते.
ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याला कडाकडून विराेध करीत या ओबीसी समाजाच्या कार्यकत्यार्नी त्याविराेधात घाेषणाबाजी केली. जय ओबीसी असे लिहिलेल्या पिवळ्या टाेप्या घातलेल्या कार्यकत्यार्ंनी बंद करा बंद करा, शाेषण आमचे बंद करा, शिक्षणाचे खासगीकरण बंद करा आदी घाेषणाचे फलक घेऊन या कार्यकर्त्यानी आज निदर्शने केली.
मराठा समाजाच्या रक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. ओबीसी समाजाच्या ताटात मुळातच चतकोर भाकरी आहे. तेही आरक्षण हिरावले जात आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवले पाहिजे, राज्यात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, आदी मागण्या या आंदाेलनकर्त्यांनी केल्या.