‘डॉन बॉस्को’च्या फीवाढीविरोधात निदर्शने

By admin | Published: April 9, 2017 02:40 AM2017-04-09T02:40:50+5:302017-04-09T02:40:50+5:30

शहरातील ‘डॉन बॉस्को’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सरसकट ४० टक्के फीवाढ केली आहे. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त

Demonstrations against 'Don Bosco' | ‘डॉन बॉस्को’च्या फीवाढीविरोधात निदर्शने

‘डॉन बॉस्को’च्या फीवाढीविरोधात निदर्शने

Next

बदलापूर : शहरातील ‘डॉन बॉस्को’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सरसकट ४० टक्के फीवाढ केली आहे. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याविरोधात शनिवारी आंदोलन केले.
डॉन बॉस्को शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांना कोणतीच पूर्वसूचना न देता ४० टक्के फीवाढ केली. त्याच्या निषेधार्थ पालकांनी सकाळी शाळेसमोर मूक निदर्शने करून शाळा प्रशासनाचा निषेध केला. या वेळी महिला-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापनाने फीवाढ करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. तसेच शाळेचे मुख्याध्यापक महिला पालकांशी असभ्यपणे वागतात, असा आरोपही पालकांनी केला.
शाळेच्या या फीवाढीविरोधात पालकांनी शाळेच्या गेटसमोर आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. यासंदर्भात शाळेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच पत्रकारांना भेटण्याचे टाळले. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations against 'Don Bosco'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.