टिटवाळ्यात डेंग्यूने मुलाचा मृत्यू

By admin | Published: August 12, 2016 02:14 AM2016-08-12T02:14:13+5:302016-08-12T02:14:13+5:30

शहरातील नांदप रोडवरील साईनाथनगर येथील चाळीत राहणाऱ्या शिवा कनोजिया (१२) याचा डेंग्यूने त्याच्या वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना

Dengue causes death of son | टिटवाळ्यात डेंग्यूने मुलाचा मृत्यू

टिटवाळ्यात डेंग्यूने मुलाचा मृत्यू

Next

टिटवाळा : शहरातील नांदप रोडवरील साईनाथनगर येथील चाळीत राहणाऱ्या शिवा कनोजिया (१२) याचा डेंग्यूने त्याच्या वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाला दोषी ठरवण्यात येत आहे. दरम्यान, शिवाच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाची यंत्रणा टिटवाळ्यात दाखल झाली आहे.
शिवा येथील जी.आर. पाटील शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होता. शुक्र वारी त्याचे हातपाय दुखत असल्याने येथील डॉ. केदार पंडित यांच्या दवाखान्यात त्याने उपचार घेतले. मात्र, पुन्हा त्याला ताप आल्याने डॉ. पंडित यांनी रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. त्यात रक्तात प्लेटलेट्स ९० हजारांच्या आसपास असल्याने त्याला ग्लुकोज व अ‍ॅण्टिबायोटिक सुरू केले. मात्र, प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. तेथेही त्याच्या रक्ताच्या चाचण्यांबरोबरच डेंग्यूची चाचणी केली. त्यात डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याच्या प्लेटलेट्सची संख्या ४५ हजारांच्या आसपास असल्याने डॉ. चौघुले यांनी त्याला उपचारासाठी कल्याणमधील मेट्रो रुग्णालयात पाठवले. मेट्रोने उपचार न केल्याने त्याच्या नातेवाइकांनी रॉयल रुग्णालयात हलवले. तेथेही त्याला घेतले नाही. शेवटी, त्याला खडकपाडा येथील आयुष हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. डॉक्टरांनी नातेवाइकांना सहा रक्ताच्या बाटल्या आणण्यास सांगितले. त्याने उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याचा बुधवारी मृत्यू झाला. (वार्ताहर)

Web Title: Dengue causes death of son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.