डेंग्यूने वाढवला ड्रॅगन फ्रूटचा भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:10+5:302021-09-02T05:28:10+5:30
ठाणे : एकीकडे श्रावण महिना असल्याने फळांची मागणी वाढली असतानाच डेंग्यूच्या संकटाने ड्रॅगन फ्रूट आणखी महागले आहे. श्रावण महिना ...
ठाणे : एकीकडे श्रावण महिना असल्याने फळांची मागणी वाढली असतानाच डेंग्यूच्या संकटाने ड्रॅगन फ्रूट आणखी महागले आहे.
श्रावण महिना म्हटलं की, फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. अनेकांचे उपवास असल्याने फळे मोठ्या प्रमाणात खरेदी होतात. इतर उपवासाच्या पदार्थांबरोबर फळांचाही समावेश असतो. त्याचप्रमाणे आहारतज्ज्ञही फळे खाण्यावर भर देण्यास सांगतात. दिवसातून एक फळ तरी खावे, ते शरीरास चांगले असते. फक्त ऋतुमानानुसार फळे खाण्याचे आहारतज्ज्ञ सूचित करतात. डेंग्यू झाल्यास ड्रॅगन फ्रूट खाण्याचाही सल्ला दिला जातो. त्यामुळे डेंग्यूसाठी उपायकारक असलेल्या ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढली असून, दुसरीकडे केळी स्वस्त झाल्याचे चित्र सध्या फळ बाजारात आहे.
१) फळांचे दर (प्रतिकिलो)
ड्रॅगन फ्रूट : २५० रुपये किलो
डाळिंब : २०० रु. किलो
सफरचंद : १८० ते २०० रु. किलो
संत्रा : २०० रु. किलो
मोसंबी : २०० रु. किलो
चिकू : १५० रु. डझन
पपई : ६० रु. किलो
पेरू : १०० रु. किलो
केळी : ४० रु. डझन
२) डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यू झाला की शरीरातील पेशी कमी होत जातात. त्यावर उपाय म्हणून ड्रॅगन फ्रूट सूचित केले जाते. ड्रॅगन फ्रूटमुळे पेशी जलद गतीने वाढतात, असे डॉक्टर सांगतात.
३) डेंग्यूसाठी ड्रॅगनची एकीकडे मागणी आहे, तर दुसरीकडे केळी स्वस्त झाली आहे. सध्याचे वातावरण थंड असल्याने केळीची मागणी घटली असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
४) डेंग्यूसाठी ड्रॅगनसह किवीदेखील खरेदी केली जाते. या दोन फळांना प्रचंड मागणी आहे. काही जण पपईपण खरेदी करतात.
धीरज गुप्ता, फळ विक्रेते