डेंटल कॉलेजमधील 130 विद्याथींची  फसवणूक; संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 09:49 PM2017-11-11T21:49:32+5:302017-11-11T21:52:01+5:30

अंबरनाथ येथील वादग्रस्त असलेल्या गार्डीयन डेंटल कॉलेजची मान्यता रद्द झाल्याने या ठिकाणी शिक्षण घेणा-या 130विद्याथींचे भवितव्य अंधारात गेले आहे.

Dental college fraud fraud; Students' challans from institutional drivers | डेंटल कॉलेजमधील 130 विद्याथींची  फसवणूक; संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक

डेंटल कॉलेजमधील 130 विद्याथींची  फसवणूक; संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक

Next

अंबरनाथ - अंबरनाथ येथील वादग्रस्त असलेल्या गार्डीयन डेंटल कॉलेजची मान्यता रद्द झाल्याने या ठिकाणी शिक्षण घेणा-या 130विद्याथींचे भवितव्य अंधारात गेले आहे. या विद्याथींना इतर महाविद्यालयात स्थलांतरीत करण्याचे आदेश असतांना देखील महाविद्यालयाचे संचालक या विद्याथ्यांचे कागदपत्र देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कागदपत्रे न मिळाल्यास इतर महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याने या मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न  भंग पावणार आहे. या प्रकरणी संस्था चालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला असता त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. 
    

अंबरनाथमधील भहुचर्चीत आणि नेहमीच वादात सापडलेल्या गार्डीयन महाविद्यालय पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. या महाविद्यालयात 2013-14 आणि 2014-15 या वर्षात प्रवेश घेतलेल्या 130 विद्याथ्र्याच्या भवितव्याशी खेळण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. या महाविद्यालयाने विद्याथ्र्याकडुन अव्वा च्या सव्वा फी वसुल करुन या मुलांना शैक्षणिक सुविधांपासुन वंचित ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कोणताच तज्ज्ञ शिक्षक या ठिकाणी आला नाही. येवढेच नव्हे तर जे नवखे शिक्षक आले ते महिन्या दोन महिन्यात सोडुन गेले. सोबत या महाविद्यालयात दंत विभागाशी निकडीत कोणतेचे प्रात्यक्षित झाले नाही. कोणत्याच सुविधा नसतांनाही या ठिकाणी 130 विद्यार्थी आपल्या हिमतीवर शिक्षण घेत होते. दंत महाविद्यालय चालविण्यासाठी ज्या सुविधांची गरज आहे त्या सुविधा नसल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कॉलेजची विद्यापीठाशी असलेले कायमस्वरुपी संलग्नता रद्द केली आहे. या महाविद्यालयाची मान्यताच रद्द केल्याने या विद्याथ्र्यापुढे आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

महाविद्यालयाची मान्यता रद्द करित असतांना या ठिकाणी शिक्षन घेणा-या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यास मान्यता देण्यात आली. 13 नोव्हेंबर रोजी स्थलांतरणाची शेवटची मुदत असल्याने या विद्याथ्र्यानी गार्डीयन महाविद्यालायत आपले कायदपत्र घेण्यासाठी गर्दी केली होती. महाविद्याल संचालकांपैकी कोणीच या ठिकाणी नसल्याने रात्रभर हे विद्यार्थी महाविद्यालयातच थांबुन राहिले. संस्थेचे पदाधिकारी आल्यावर आपल्याला आपली कागदपत्रे मिळतील या आशेवर रात्र या विद्याथ्र्यानी महाविद्यालयाच्या आवारारातच काढले. संस्थेचे प्रमुख अफान शेख यांनी या मुलांची फसवणूक करुन कागदपत्रे देण्यास नकार दिला आहे. महाविद्यालयातुन स्थलांतरणासाठी आवश्यक असलेले कागदपत्र मिळत नसल्याने या विद्याथ्र्याचे स्थलांतरीत रखडलेले आहे. महाविद्यालयामुळे या विद्याथ्र्याचे शैक्षणिक वर्ष आणि त्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. 
    

गार्डीयन महाविद्यालयात शिकणा-या 130 विद्यार्थ्यांमध्ये 35 विद्याथीर हे कश्मिरी आहेत. या मुलांना शिक्षणाची कोणतीच सुविधा नसुन वसतिगृहाची परिस्थिती देखील गंभिर स्थितीत आहे. या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात पोलीस कोणतीच तक्रार दाखल करुन घेत नसल्याने या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविद्यालयाची मान्यता रद्द झालेली असतांना देखील संस्था चालक या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे देत नसल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केले. या महाविद्यालयाची मान्यता रद्द का करण्यात आली याची माहिती घेतली असता. महाविद्यालयाने कोणतेच नियम पाळले नसल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयात प्राध्यापक वर्गाची कोणत्यास स्वरुपाची नियुक्त करण्यात आलेली नव्हती, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची ठोस सोय नव्हती, अभ्यासाशी निगडीत साहित्य अपुरे होते येवढेच नव्हे तर विद्यापीठाने जे निकश ठेवले होते त्याची कोणतीच पूर्तता केलेली नव्हती. त्यामुळे या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. 

Web Title: Dental college fraud fraud; Students' challans from institutional drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.