जातीचे कारण देत पीडित तरुणीस लग्नासाठी नकार, तीन वर्षे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 04:11 AM2018-10-01T04:11:55+5:302018-10-01T04:12:16+5:30
तरुणीचे महिला आयोगाला साकडे, जातीचे कारण केले पुढे
मुरबाड : तरुणीचे तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर तिच्या प्रियकराच्या आईवडिलांनी जातीचे कारण पुढे करून मुलाचे लग्न लावून देण्यास नकार दिल्याने आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या पीडितेने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. पोलीस यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने महिला आयोगाने दखल घेण्याची मागणी या तरुणीने केली आहे.
पीडित तरु णी आणि आरोपी महेश मोरेश्वर बांगर (वय ३०) यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाच्या आणाभाका घेऊन त्यांनी शरीरसंबंधदेखील ठेवले. दरम्यान, पीडित तरु णीच्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न निश्चित केले. या मुलासोबत तिचा साखरपुडादेखील झाला. यावर महेशने आक्षेप घेतला. आपण दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. तू त्या मुलाला नकार दे किंवा लग्नानंतरही तुला माझ्याशी शरीरसंबंध ठेवावे लागतील, अशी धमकी महेशने दिली. त्यामुळे तिने साखरपुडा झालेल्या मुलास नकार दिला. त्यानंतर, दोन वर्षे उलटली. मुलीला घरी किती दिवस ठेवणार, असा विचार करून आईवडिलांनी तिच्यासाठी दुसरे स्थळ पाहण्यास सुरु वात केली. मात्र, प्रत्येक स्थळाला मुलगी नकार देत असल्याने वैतागलेल्या पालकांनी तिला घराबाहेर काढले.
एकीकडे पालकांचे छत्र हरपले आणि दुसरीकडे प्रियकरही लग्नासाठी तयार नसल्याने पीडित मुलीची अवस्था दयनीय झाली.
तिने थेट महेशचे घर गाठून त्याच्या आईवडिलांना महेशबद्दल विचारणा केली. त्याच्यासोबत तीन वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांची कल्पना देऊन लग्नाचा विषयही तिने महेशच्या आईवडिलांना सांगितला. ते ऐकून महेशचे आईवडील तिच्यावर संतापले. तू हलक्या जातीची आहेस, आम्ही सवर्ण आहोत. त्यामुळे हे लग्न होणार नसल्याचे सांगून त्यांनी मुलीला नकार दिला. सर्व दरवाजे बंद झाल्याने पीडित मुलीने महेशविरोधात अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
उपविभागीय पोलीस अधिकारी रजेवर
च्मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे हे रजेवर असल्याने आरोपीविरुद्ध कारवाई होऊ शकली नाही.
च्आरोपी मोकाट असल्याने आपल्या जीवितास धोका असल्याचा आरोप करत पीडित मुलीने महिला आयोगाला कारवाईसाठी साकडे घातले आहे. आयोग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे आहे. ते सध्या रजेवर आहेत. मात्र, आम्ही आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
- अजय वसावे,
पोलीस निरीक्षक, मुरबाड