वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:09+5:302021-03-13T05:14:09+5:30

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ, रामजी आंबेडकर चौक परिसरातील असंख्य तरुण व महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याची ...

Deprived Bahujan Front entry | वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ, रामजी आंबेडकर चौक परिसरातील असंख्य तरुण व महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी दिली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते सुरेश सोनवणे, संघटक प्रकाश शिरसाट, बाळासाहेब अहिरे, अयुब शेख, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

-----–--------------------

वालधुनी नदीचे पाणी लालभडक

उल्हासनगर : वालधुनी नदीचे रूपांतर नाल्यात झाले असून रासायनिक कंपन्या घातक सांडपाणी सोडत असल्याने नदीच्या पाण्याचा रंग दर पाच मिनिटानी बदलत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नदीचे पाणी लालभडक असूनही प्रदूषण मंडळ कारवाई करीत नसल्याचा आरोप समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी केला आहे.

-------------------------

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन

उल्हासनगर : डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेच्या महिला विभागातर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पुरोगामी विचार केंद्राच्या सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या सुनिता खैरनार होत्या. प्रतिष्ठानच्या ठाणे जिल्हाध्यक्षा रेखा उबाळे यांनी कार्यक्रमाचे उदघाट्न केले. यावेळी माजी नगरसेविका लता निकम उपस्थित होत्या. मनीषा झेंडे यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रतिष्ठानच्या पद्मा इंगळे, शारदा अंभोरे, लता गवई, अनिता रणदिवे, सिंधू मेढे, लता पडघान आदींनी मार्गदर्शन केले. लोकेश कांबळे यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Deprived Bahujan Front entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.