ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार
By जितेंद्र कालेकर | Updated: January 12, 2025 21:42 IST2025-01-12T21:41:43+5:302025-01-12T21:42:04+5:30
नविन आव्हाने स्वीकारण्याची सवय: एकनाथ शिंदे

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार
ठाणे: महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात विकासात्मक कामे केल्यानेच विधानसभा निवडणूकीत मतदारांनी चांगला काैल दिला. महाविकास आघाडी ही नव्हतीच. ते केवळ निवडणूकीसाठी एकत्र आले हाेते. लाेकसभा निवडणूकीत त्यांनी केलेली फेकाफेकी विधानसभा निवडणूकीत मतदारांनी बंद पाडली.
आम्हाला नविन आव्हाने स्वीकारण्याची सवय असल्याचा टाेलाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना रविवारी लगावला.
ठाण्यात सिंघानिया समुहाच्या वतीने आयाेजित केलेल्या विंटेज आणि सुपर कारच्या प्रदर्शनाला शिंदे यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध उद्याेगपती गाैतम सिंघांनिया यांच्यासमवेत त्यांनी विंटेज कारचा थरार अनुभवला. यावेळी एका रेसिंग कारचे ड्रिफ्टींगही त्यांनी केले. सुपर कार, सुपर बाईक आणि विंटेज कार चालविण्याचा नवा अनुभवही त्यांनी घेतला.
यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित हाेते. ठाण्यात १० ते १२ जानेवारी असे तीन दिवस विंटेज कार आणि बाईकच्या प्रदर्शनाचे आयाेजन केले हाेते. यात एक हजार काेटींच्या ३२० प्रकारच्या १२५ वर्षांपेक्षा जुन्या विंटेज कारचा तसेच अत्याधुनिक सुपर कार आणि बाईकचा समावेश हाेता. यातील एका कारचे सारथ्य सिंघानिया यांनीही शिंदे यांच्यासमवेत केले. त्यानंतर स्वत: शिंदे यांनी रेसिंग कार चालवून आपल्याला नवीन आव्हाने स्वीकारण्याची सवय असल्याचे सांगून ठाणे शहर आता बदलत असल्याचे सांगितले.
ठाण्यातील उपवन फेस्टीवल आणि वर्तकनगरच्या कार फेस्टचे त्यांनी काैतुक केले. केवळ उतुंग इमारती म्हणजे विकास नव्हे तर चांगले उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विकास कामे हाेणे यातूनही विकास हाेत असताे. गेल्या अडीच वर्षात राज्यात माेठी विकास कामे केल्यानेच मतदारांनी भरघाेस मतांनी महायुतीला निवडून दिले. महाविकास आघाडीने एकत्र लढावे की वेगळे हा त्यांचा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. शिंदे यांना बाईक आणि विंटेज कारचे सारथ्य केल्याचे पाहून ठाणेकरांनी त्यांना चांगलीच दाद दिली.