पोलीस उपअधीक्षकाचा जबाब नोंदवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:19 AM2017-12-08T04:19:34+5:302017-12-08T04:19:43+5:30
अमरावती ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांचा जबाब ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी नोंदवला. मोपलवार प्रकरणात आरोपीच्या तपासादरम्यान त्यांचा संदर्भ मिळाला होता.
ठाणे : अमरावती ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांचा जबाब ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी नोंदवला. मोपलवार प्रकरणात आरोपीच्या तपासादरम्यान त्यांचा संदर्भ मिळाला होता.
सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केलेल्या मांगलेच्या लॅपटॉपमधून चार हजार कॉल रेकॉडर््स पोलिसांनी हस्तगत केले होते. त्यापैकी काही रेकॉडर््समध्ये पाटील यांचा संदर्भ आढळल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. खंडणीविरोधी पथकाने तिसरी नोटीस बजावल्यानंतर ते गुरुवारी जबाब नोंदवण्यासाठी आले. मोपलवार यांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी खासगी डिटेक्टिव्हची गरज होती. आपण मुंबई येथे कार्यरत असताना सतीश मांगलेचा परिचय झाला होता. आपण केवळ मोपलवार यांच्याशी मांगलेची ओळख करून दिली होती. गेली अडीच वर्षे आपण विदर्भात कार्यरत आहोत. या काळात जे काय झाले, त्याच्याशी आपला संबंध नसल्याचा दावा त्यांनी जबाबामध्ये केला आहे.