देशमुख होम्समधील पाण्याची समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:37 AM2021-08-01T04:37:18+5:302021-08-01T04:37:18+5:30
कल्याण : कल्याण-शीळ रस्त्यावरील टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील १२० दिवसांपासून ...
कल्याण : कल्याण-शीळ रस्त्यावरील टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील १२० दिवसांपासून सोसायटीत पाणी न आल्याने सोसायटीला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. याप्रकरणी शनिवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी देशमुख होम्सला भेट दिली. यावेळी संतप्त महिलांनी पाणीटंचाईचे गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. त्यावर ही पाणी समस्या लवकरच सोडविली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी सोसायटीच्या वंदना सोनावणे, समृद्धी चाळके, अमरसेन चव्हाण, धीरज राजाभोज, सत्यवान पाटील, धेनू राठोड, सुरेंद्र राठोड, संतोष सुतार, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.
देशमुख होम्स सोसायटीत १,३०० रहिवासी राहत आहेत. या सोसायटीला १२० दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे रहिवासी टँकर मागवून तहान भागवत आहेत. मात्र, टँकरने किती दिवस पाणी मागविणार? भर पावसाळ्य़ात पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडे धाव घेतली. पाटील यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते राजीव पाठक यांनाही बोलावून घेतले होते. पाण्याचा दाब कमी आहे. यापूर्वीही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी बैठक घेऊन पाणी मिळाले नाही तर नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल. नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला होता.
स्वतंत्र जलवाहिनी टाकणार
देशमुख होम्सही सोसायटी केडीएमसी हद्दीत असली तरी या सोसायटीला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका बिल वसूल करते. ते एमआयडीसीला भरते. मात्र, या नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी देशमुख होम्सला पाणीपुरठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले आहे.
फोटो-कल्याण-राजू पाटील.
----------------------