पूल असूनही रेल्वेरूळ ओलांडून नागरिकांचा चाले जीवाशी खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:14 AM2019-07-11T00:14:26+5:302019-07-11T00:14:28+5:30

दिवा स्थानकातील प्रकार : दोन्ही बाजूला भिंती उभारण्याचा पर्याय

Despite the bridge, citizens play across the railway tracks! | पूल असूनही रेल्वेरूळ ओलांडून नागरिकांचा चाले जीवाशी खेळ !

पूल असूनही रेल्वेरूळ ओलांडून नागरिकांचा चाले जीवाशी खेळ !

googlenewsNext

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने येथे रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधला असला तरी दिव्यातील नागरिक मात्र कानाडोळा करून रूळ ओलांडून आपल्याच जीवाशी खेळताना दिसत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाने जनजागृती करूनही नागरिकांची ही सवय जात नसल्याने फाटकाच्या दोन्ही बाजूला भिंती उभारणे हाच पर्याय असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दिवा स्थानकातून दिवसाला अंदाजे एक लाख वीस हजार तर महिन्याला तेहतीस लाख तीस हजार इतके प्रवासी तिकीट घेउन प्रवास करतात. यातील अनेक जण दररोज रुळ ओलांडताना दिसतात. प्रशासनाने प्रवाशांसाठी उपाययोजना करुनही प्रवासी त्याक डे दुर्लक्ष करीत आहेत
दिवा हे जंक्शनसुद्धा आहे. पश्चिमेला काहीच नसून पूर्वेला नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी दर पाच मिनिटाने फाटक परिसरात रुळ ओलांडते. शाळा,बँक, हॉटेलसह आरोग्यकेंद्र तसेच नागरिकांच्या सोयीसुविधा फाटकच्या पलीकडे असल्याने येथील नागरिक सतत तिकडे धाव घेताना दिसतात. प्रशासनाने पुलाची व्यवस्था करूनही येथील नागरिक याचा उपयोग का करत नाही हा गंभीर प्रश्न समोर येतो.
रहदारीवर नियंत्रणासाठी नवीन पादचारी पूलही येथे उभारण्यात आलेला आहे. तरीदेखील येथील नागरिक न चुकता रुळ ओलांडतात. दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळेसही येथील पादचारी पुलावर शुकशुकाट पसरलेला असतो आणि नागरिक रुळ ओलांडत असतात. या परिसरामध्ये आठ फलाट असून सहा पादचारी पुलाची व्यवस्था आहे. यापैकी तीन पादचारी पूल हे रेल्वे फाटकला जोडणारे आहेत. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, हे लक्षात घेता ठाणे महापालिका व रेल्वेप्रशासनाने नागरिकांची ही सवय मोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करण्याचा निर्णय घेऊन दोन उंच भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दिवास्थानकादरम्यान ब्रीजच्या बांधकामाला रेल्वेने मंजुरी दिल्याने लवकरच ठाणे महापालिकेच्या वतीने कामाला सुरुवात होणार आहे.

ंूआरपीएफ पोलीस येथील नागरिकांना समजावून कंटाळून गेलेले आहेत. मात्र त्यांची रूळ ओलांडण्याची सवय गेलेली नाही. जोपर्यंत नागरिक स्वत: जबाबदार बनणार नाही तोपर्यंत त्यांच्यात शिस्त येणार नाही.
- एक रेल्वे अधिकारी, दिवा

Web Title: Despite the bridge, citizens play across the railway tracks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.