भरपावसातही आयुक्तांनी केली नालेसफाईची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:41+5:302021-06-09T04:49:41+5:30
ठाणे : महापालिकेने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे केली असून, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही भरपावसात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा ...
ठाणे : महापालिकेने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे केली असून, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही भरपावसात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्तीची पाहणी केली.
सकाळी ११ वाजता शर्मा यांनी वंदना बस डेपो येथून या पाहणीस सुरुवात केली. यावेळी वंदना बस डेपो, शिवप्रसाद, आंबेडकरनगर, एम.एच. हायस्कूल, सिडको क्रीक रोड, सरस्वती स्कूल, राबोडी, साकेतनाला, सह्याद्री नाला, दत्तवाडी तसेच शनिमंदिर साईनाथनगर आदी नाल्याची पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी नाल्याची रुंदी वाढविणे, खोली वाढविणे, खाडीच्या मुखाजवळ नाले रुंद करणे तसेच कचरा व सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. दरम्यान, ९ जून ते १२ जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने ठाणे महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शर्मा यांनी केले. याप्रसंगी त्या त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.