कोरोनारुग्ण वाढत असले तरी ठाण्यात ४९ टक्के बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:53+5:302021-03-19T04:39:53+5:30

ठाणे : कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, तरीही मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत ...

Despite the increase in coronary heart disease, 49 per cent beds remain in Thane | कोरोनारुग्ण वाढत असले तरी ठाण्यात ४९ टक्के बेड शिल्लक

कोरोनारुग्ण वाढत असले तरी ठाण्यात ४९ टक्के बेड शिल्लक

googlenewsNext

ठाणे : कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, तरीही मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या १६ दिवसांत ठाण्यात कोरोनाचे तब्बल चार हजार ३७१ नवे रुग्ण आढळले आहेत. परंतु,यामध्ये घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या जवळपास ९० टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळेच शहरातील कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला दोन हजार २५० पैकी एक हजार १५१ बेड वापरात असून एक हजार ९९ बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली.

रुग्ण वाढल्याने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. अशातच आता मार्च महिन्यात अवघ्या १६ दिवसात शहरात नवे चार हजार ३७१ रुग्ण वाढल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तीन हजार ४२ एवढी आहे. तर प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या तीन हजार ४१ एवढी आहे. यामध्ये ७९२ रुग्ण हे असे आहेत, ज्यांची सौम्य लक्षणे आहेत. तर दोन हजार ९१ रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. १५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून १४१ आयसीयुमध्ये आहेत. तर १७ रुग्ण हे व्हेटिंलेटरवर आहेत. तर एक हजार ५८७ रुग्ण हे घरीच उपचार घेत असून ९६७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी रुग्णालयात बेड मिळत नव्हते. परंतु, या वर्षी मात्र सध्या तरी कुठेही बेड मिळत नाही अशी तक्रार अद्यापही महापालिकेकडे आलेली नाही. महापालिका हद्दीत सध्या विविध रुग्णालयात २५० बेड असून त्यातील एक हजार १५१ आरक्षित असून एक हजार ९९ बेड शिल्लक आहेत. ४९ टक्के बेड शिल्लक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये जनरल बेड एक हजार १३२ असून त्यातील ३१२ आरक्षित असून ८२० बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनचे ७९८ पैकी १४७, आयसीयुचे ३२० पैकी १४९, व्हेंटिलेटरचे १७० पैकी १५३ बेड शिल्लक असून तूर्तास तरी ठाण्यात रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे.

Web Title: Despite the increase in coronary heart disease, 49 per cent beds remain in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.