मोठया बाजारपेठेचे कार्यक्षेत्र असूनही कोरोनाला थोपविण्यात ठाणेनगर पोलिसांना मिळाले यश

By जितेंद्र कालेकर | Published: April 30, 2020 11:15 PM2020-04-30T23:15:28+5:302020-04-30T23:18:44+5:30

व्यापारी आणि नागरिकांच्या सहकार्यातून ठाणेनगर पोलिसांनी सोशल डिस्टसिंगची काटेकोरपणे अंमलबजावाणी केली. त्यामुळेचे ठाणे शहरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेचे मोठे कार्यक्षेत्र असूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराला थोपविण्यात पोलिसांना चांगल्या प्रकारे यश मिळविले आहे.

 Despite the large market area, Thane police succeeded in Control Corona | मोठया बाजारपेठेचे कार्यक्षेत्र असूनही कोरोनाला थोपविण्यात ठाणेनगर पोलिसांना मिळाले यश

सोशल डिस्टसिंगची केली कोटेकोर अंमलबजावणी

Next
ठळक मुद्देकिरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या वर्दळीवरही मिळविले नियंत्रणसोशल डिस्टसिंगची केली कोटेकोर अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेचे मोठे कार्यक्षेत्र आपल्या हद्दीत असूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराला थोपविण्यात ठाणेनगर पोलिसांना चांगल्या प्रकारे यश आले आहे. व्यापारी आणि नागरिकांच्या सहकार्यातून पोलिसांनी सोशल डिस्टसिंगची काटेकोरपणे अंमलबजावाणी केली. त्यामुळे या परिसरात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संपूर्ण ठाणे शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात याऊलट सुदैवाने अद्याप एकही कोरोनाबाधित रु ग्ण आढळलेला नाही. त्यामुळेच या पोलिसांचे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून कौतूक केले जात आहे. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भाजीपाला, मसाले, कांदे बटाटयाची तसेच इतरही किराणा मालाची मोठी घाऊक बाजारपेठ आहे. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळही असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी सोशल डिस्टसिंगच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अंतर ठेऊन कोरोनाची साखळी तोडण्यात विशेष प्रयत्न केले. अन्य पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले परंतू या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या चार पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची बाधाही झाली होती. तसेच एका पोलीस अधिकाºयालाही त्याचा संसर्ग ते वास्तव्यास असलेल्या पोलीस वसाहतीमधून झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी एकाला आता बुधवारी रात्री घरीही सोडण्यात आले आहे. तर पोलीस अधिकारीही आता कोरोनामुक्त झाला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील भाजीपाला विक्रीच्या दुकानांचे अन्यत्र स्थलांतर केले आहे. याशिवाय, या भागात सकाळी भरणाºया घाऊक बाजारपेठेत येणाºयांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाते. तोंडावर मास्क नसल्यास किमान रुमाल लावण्यासाठी ग्राहकांना आग्रह धरला जातो. तोही नसेल तर मात्र अशा ग्राहकांना थेट घरचा रस्ता दाखविला जातो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी दिली. ठाणे शहरात कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होत असला तरी ठाणेनगरच्या हद्दीमध्ये कोरोनाला शिरकाव करु देणार नाही, असा ठाम विश्वास सोमवंशी यांनी व्यक्त केला आहे.
 

‘‘वारंवार गस्त घालून निगराणी ठेवली जाते. शिवाय मेगाफोनद्वारेही नागरिकांना घरी राहण्याचे तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले जाते. तोंडावर मास्क नसल्यास किमान रुमाल लावण्यासाठी ग्राहकांना आग्रह धरला जातो. मास्क नसेल तर कोणालाही किराणा दिला जात नाही. जनतेनेही पोलिसांना असाच प्रतिसाद दिला तर ठाणे शहर लवकरच कोरोनामुक्त होईल.’’
राम सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर

 

Web Title:  Despite the large market area, Thane police succeeded in Control Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.