महिला पोलिसांशी अश्लील संभाषण करणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:21 AM2019-07-09T06:21:20+5:302019-07-09T06:21:24+5:30

ठाणेनगर पोलिसांची कारवाई; तिघांना न्यायालयीन कोठडीत

Detained with obscene conversations with women police | महिला पोलिसांशी अश्लील संभाषण करणारे अटकेत

महिला पोलिसांशी अश्लील संभाषण करणारे अटकेत

Next

ठाणे : ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी ‘एक शून्य शून्य’ या क्रमांकावर संपर्क साधून अश्लील संभाषण करणाऱ्या मुकेश सक्सेना (१९), गिरीश सक्सेना (१९) आणि आसू गौड (२४) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच सोमवारी अटक केली. तिघेही डोंबिवलीच्या मानपाडा भागातील रहिवासी असून त्यांना २२ जुलै २०१९ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.


हे टोळके २७ जून २०१९ पासून ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर संपर्क साधून अर्वाच्य भाषेत महिला पोलिसांशी संवाद करीत होते. कोणीतरी मद्यपी नशेत फोन करून असे बडबडत असावा, असा समज करून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अधूनमधून असे फोन येत होते. परंतु, ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीसाठी संपर्क करीत असल्याने, तसेच या नियंत्रण कक्षाला वरिष्ठांनाही गुन्ह्यांचा अहवाल देणे गरजेचे असल्याने त्यांनी पुन्हा याकडे दुर्लक्ष केले. परंतु, ७ जुलै रोजी ११.४९ वाजताच्या सुमारास आलेल्या फोनमुळे या महिला कर्मचारीही अस्वस्थ झाल्या.

या कर्मचाऱ्यांनी फोन उचलून समोरील व्यक्तीला काही मदत हवी आहे का, अशी विचारणा केल्यानंतर मुकेश सक्सेना आणि त्याच्या दोन्ही साथीदारांनी अत्यंत अश्लील भाषेत संभाषण करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या प्रकाराचा कहर झाल्याने नियंत्रण कक्षातील महिलांनी अखेर वरिष्ठ अधिकाºयांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Detained with obscene conversations with women police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.