तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक, वाहन विक्रेत्यास फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:00 AM2018-06-21T03:00:58+5:302018-06-21T03:00:58+5:30

पोलीस अधिका-याचा गणवेश घालून ठाण्यातील एका वाहन विक्रेत्यास ५.६४ लाख रुपयांनी लुबाडणा-या तोतया अधिका-यास नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली.

Detective police officer arrested | तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक, वाहन विक्रेत्यास फसवले

तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक, वाहन विक्रेत्यास फसवले

Next

ठाणे : पोलीस अधिका-याचा गणवेश घालून ठाण्यातील एका वाहन विक्रेत्यास ५.६४ लाख रुपयांनी लुबाडणा-या तोतया अधिका-यास नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घोडबंदर रोडवरील पाटस्कर डिकलेंडचा रहिवासी गजानन लक्ष्मण पालवे हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. मार्च २0१७ मध्ये तो पाचपाखाडी येथील वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाºया फास्ट ट्रॅक एन्टरप्रायजेसमध्ये गेला. आपल्याला पैशाचे तातडीचे काम असून, त्यासाठी दोन कार विकत असल्याचे त्याने फास्ट ट्रॅकचे मालक संजय म्हस्के यांना सांगितले. म्हस्के यांनी त्याला गाड्यांची मूळ कागदपत्रे मागितली. मात्र गजानन पालवे गाड्यांची कागदपत्रे देऊ शकला नाही. त्यामुळे म्हस्के यांनी गाड्या विकत घेण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी गजानन पालवे पुन्हा म्हस्के यांच्याकडे गेला. त्यावेळी त्याने पोलीस अधिकाºयाचा गणवेश परिधान केला होता. त्याने पुन्हा दोन्ही कार विकत घेण्याचा आग्रह म्हस्के यांना केला. गाड्यांची मूळ कागदपत्रे लवकरच आणून देऊ अशी ग्वाही त्याने दिली. पोलीस अधिकाºयाचा गणवेश बघून म्हस्के यांनी नकार दिला नाही. त्यांनी १00 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केला. गाडी मालकाचे नाव बदलण्यासाठी आरटीओच्या कागदपत्रांवर त्याच्या सह्यादेखील घेतल्या. त्यानंतर दोन्ही गाड्यांचा मोबदला म्हणून ५ लाख ६४ हजार त्यांनी आरोपी पालवेला दिले. त्यानंतर गाड्यांच्या मूळ कागदपत्रांसाठी म्हस्के यांनी आरोपीशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्याने टाळाटाळ केली.
>एकाची टोपी दुसºयाला घालणे, हाच आरोपीचा धंदा आहे. तोतया पोलीस अधिकारी बनून त्याने यापूर्वी किती जणांची आणि किती रुपयांनी फसवणूक केली, त्याचे साथीदार आणखी कोण-कोण आहेत, या मुद्यांची उकल आरोपीच्या चौकशीतूनच होऊ शकेल.
- चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

Web Title: Detective police officer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.