रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालनाच नाही , रिक्षांमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:25 AM2017-12-18T01:25:49+5:302017-12-18T01:25:59+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांच्या संख्येत भर पडत आहेत. रिक्षा व्यतीरिक्त सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने नोकरदार मंडळी रेल्वेस्थानक गाठण्यासाठी स्वत:च्या वाहनातून येतात. तेथे त्या उभ्या करून कामावर जातात. रेल्वेस्थानक ते मंदिराकडे जाणाºया रस्त्याच्या बाजूला रिक्षातळ आहे.

 The development of the railway station does not have any kind of development, due to the rakshakandikandi | रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालनाच नाही , रिक्षांमुळे वाहतूककोंडी

रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालनाच नाही , रिक्षांमुळे वाहतूककोंडी

googlenewsNext

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांच्या संख्येत भर पडत आहेत. रिक्षा व्यतीरिक्त सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने नोकरदार मंडळी रेल्वेस्थानक गाठण्यासाठी स्वत:च्या वाहनातून येतात. तेथे त्या उभ्या करून कामावर जातात. रेल्वेस्थानक ते मंदिराकडे जाणाºया रस्त्याच्या बाजूला रिक्षातळ आहे. मात्र या तळावर अरूंद जागा असल्याने जास्त रिक्षा उभ्या राहू शकत नाहीत. बहुतेक रिक्षाचालक तर पादचारी पुलाच्या पायरीला लागूनच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पादचारी पुलाकडे जाताना पादचारी, प्रवाशाला रिक्षांचा अडसर सहन करावा लागतो. रिक्षा तळाला लागूनच रेल्वेची तिकीट खिडकी आहे. तेथे काम सुरू असल्याने त्याठिकाणी पाया खोदण्याकरिता खड्डे तयार केले आहेत. आजूबाजूला माती व बांधकाम साहित्य तसेच पडून आहे. त्याचीही भर रस्ता व मोकळी जागा अडवून ठेवण्यात पडली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आठ रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्यात येणार आहे. टिटवाळा स्थानक परिसराचा विकास त्यात केला जाणार असला तरी तूर्तास कल्याण रेल्वे स्थानकास प्राधान्य देण्यात आले आहे. स्मार्ट सिटी ही कल्याण सेंट्रीक असल्यामुुळे टिटवाळ््याचा नंबर स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात कधी लागणार हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे.
एनआरसीच्या मालमत्तेचा वाद
‘अ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत ११ प्रभाग येतात. या ११ प्रभागातून पाणी बिलाची वसुली आत्तापर्यंत दोन कोटी ५० लाख इतकी झाली आहे. मालमत्ता कराची वसुली आत्तापर्यंत १४ कोटी ३५ लाख झाली आहे. या प्रभाग क्षेत्रातून महापालिकेस मालमत्ता करापोटी १८० कोटी येणे बाकी आहे. ही १८० कोटीची रक्कम एनआरसीच्या मालमत्ता कराची थकबाकी धरून आहे.
कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या -
स्टेशन ते गणपती मंदिर रस्ता हा काँक्रिटचा तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच मोठ्या कचराकुंड्या असल्या तरी त्याच्या बाहेर कचरा दिसून येतो. कचराकुंड्या फुल्ल झाल्या आहेत. त्याठिकाणी कुत्री, गाई यांचा सतत वावर असतो. घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. काही ठिकाणी तर घंडागाडी येत नाही अशी तक्रार करण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत टिटवाळ््यात बोंब आहे. सांडपाण्याचा निचराही योग्य प्रकारे होत नसल्याने सांडपाणी काही ठिकाणी रस्त्यावरुन वाहत आहे.
मांडा घनकचरा
प्रकल्पास विरोध
केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी उंबर्डे येथे ३५० व बारावे येथे २५० मेट्रीक टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याचबरोबर टिटवाळ्यातील मांडा येथे १५० मेट्रीक टन क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल. उंबर्डे व बारावे प्रकल्पास जनसुनावणी दरम्यान नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने मांडा प्रकल्पासही भाजपा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी विरोध केला होता. त्यामुळे मांडा प्रकल्पास नागरिकांचा विरोध आहे.
रेल्वे फाटक सुरूच अन् कोंडीही रोजचीच-
२००८ नंतर रेल्वेची सर्व फाटके बंद करून तेथे पादचारी पूल उभारला जाईल अथवा उड्डाणपूल उभारण्याचे धोरण रेल्वेने आखले होते. त्याचा विसर रेल्वेला टिटवाळ््यात पडला असल्याची तिखट प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. टिटवाळा येथील रेल्वे फाटकात रोजच वाहतूक कोंडी होते. शिवाय फाटकाजवळील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

एकही उद्यान नाही...
टिटवाळा मंदिर परिसराजवळचे उद्यान सोडले तर शहरात एकही उद्यान केडीएमसीने विकसित केलेले नाही. एका बड्या विकासकाने उद्यान विकसित केले आहे. ते महापालिकेस हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया अद्याप पार पडलेली नाही अशी स्थानिकांची माहिती आहे.
४० कोटींचे जलवाहिनीचे काम
टिटवाळ््यातील इंदिरानगर आदिवसी वस्तीकरिता महापालिकेने ४० कोटी रुपयांची पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा मंजूर केली होती. तिचा कार्यादेशही देण्यात आला होता. मात्र या कामाचे पुढे काय झाले याचा काहीही पत्ता महापालिकेच्या लेखी नाही. हे काम कशामुळे रखडले आहे याचेही उत्तर महापालिकेकडे नाही.
रूग्णालयाचे भूसंपादन रखडले
टिटवाळ््यात रूग्णालय उभारण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी १५ हेक्टर जागा लागणार आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी त्याचे भूसंपादन अद्याप झालेले नाही. महापालिकेने सुपरस्पेशालिटी रूग्णालयाला प्राधान्य दिले असले तरी त्याच्या कामाची गती फारशी झालेली नाही. ठाणे सिव्हील रुग्णालयाच्या धर्तीवर हे रूग्णालय उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
बल्याणी ते माताजी मंदिर रस्त्याची दुरवस्था
आंबिवली येथील मोहने कंपनीच्या संरक्षक भिंतीपासून टिटवाळ््याकडे बल्याणी गावामार्गे जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. एखाद्या ग्रामपंचायतीला शोभावा असा हा रस्ता आहे. जवळपास साडेचार किलोमीटर रस्ता हा माताजी मंदिरापर्यंत अत्यंत खराब आहे.
माताजी मंदिर, गणेश नगर सोसायटी ते टिटवाळा स्टेशनकडे जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले असले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ व गटार बांधण्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडलेले आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ११ कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला जाणार आहे. तर काम अर्धवट सोडणाºया कंत्राटदारावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल य निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
केवळ तीन तासच पाणीपुरवठा
टिटवाळा परिसरात काही भागात केवळ तीन तासाच नळाला पाणी येते. त्यामुळे काही जुन्या भागात व नव्या ठिकाणी बोअरिंगच्या पाण्याचा वापर केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक घरांमध्ये बाटलीबंद पाणी आणून स्वयंपाक केला जातो. मोहिली जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे टिटवाळ््याला पुरेसे पाणी मिळते.
जवळपास ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा टिटवाळा परिसरात केला जातो. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य नाही असा दावा महापालिकेकडून केला जातो. बहुधा पाणी पुरेसे मिळत असेल मात्र बेकायदा चाळींच्या बांधकामासाठी त्याचा जास्त वापर केला जात असल्याने प्रत्यक्षात करपात्र नागरिकांना त्याचा पुरवठा कमी होत असेल.

Web Title:  The development of the railway station does not have any kind of development, due to the rakshakandikandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे