देवेंद्र फर्नांडिस! मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता अभिनंदनाच्या बॅनरवर नावच बदललं 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:26 AM2022-07-07T09:26:42+5:302022-07-07T09:27:09+5:30

Devendra Fadanvis: नव्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे बॅनर ठिकठिकाणी लागत आहेत. मात्र त्यामध्ये एके ठिकाणी बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचं नावच बदलून टाकण्यात आल्याने या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Devendra Fernandes! I got the post of Deputy Chief Minister instead of the post of Chief Minister, now the name has been changed on the congratulatory banner | देवेंद्र फर्नांडिस! मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता अभिनंदनाच्या बॅनरवर नावच बदललं 

देवेंद्र फर्नांडिस! मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता अभिनंदनाच्या बॅनरवर नावच बदललं 

googlenewsNext

ठाणे -  अनेक धक्कादायक घडामोडींनंतर गेल्या आठवड्यात राज्यात सत्तांतर झालं. मात्र त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने अनेकांना आश्चर्चाया धक्का बसला होता. दरम्यान, हा बदल स्वीकारत नव्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे बॅनर ठिकठिकाणी लागत आहेत. मात्र त्यामध्ये एके ठिकाणी बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचं नावच बदलून टाकण्यात आल्याने या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मीरा रोडमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असून, त्यामध्ये चक्क देवेंद्र फणडवीस यांचं नाव देवेंद्र फर्नांडिस असं लिहिलं गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच त्यावरून नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीलाही आयते खाद्य मिळाले आहे.

मिरा-भाईंदरमधील नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. मात्र या बॅनरमधील इतर उल्लेख बरोबर आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या टायपिंगमध्ये गलती से मिस्टेक झाल्याने हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Read in English

Web Title: Devendra Fernandes! I got the post of Deputy Chief Minister instead of the post of Chief Minister, now the name has been changed on the congratulatory banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.