डीएफसीसी प्रकल्पात बाधित होणारी ७३ घरे तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:19+5:302021-06-23T04:26:19+5:30

डोंबिवली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पामध्ये (डीएफसीसी) बाधित होणारी घरे तोडण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. त्याअंतर्गत ...

DFCC demolished 73 houses affected by the project | डीएफसीसी प्रकल्पात बाधित होणारी ७३ घरे तोडली

डीएफसीसी प्रकल्पात बाधित होणारी ७३ घरे तोडली

Next

डोंबिवली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पामध्ये (डीएफसीसी) बाधित होणारी घरे तोडण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. त्याअंतर्गत पूर्वेतील आयरे गावात रेल्वेमार्गाला लागून असणारी ७३ घरे रेल्वेकडून जमीनदोस्त करण्यात आली.

मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डीएफसीसी प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहे. देशातील सर्वांत व्यस्त असणाऱ्या जेएनपीटी प्रकल्पाला हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. जेणेकरून मालवाहतुकीची क्षमता वाढविण्यासह त्याच्या वेळेतही बचत होऊ शकणार आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांतून या प्रकल्पाचा मार्ग जात आहे. त्यात डोंबिवलीच्या आयरे परिसरात २७३ घरे बाधित होत असून, त्यापैकी १०५ जणांना रोख मोबदला देण्यात आला आहे. अशा १०५ पैकी ७३ घरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या मुंबई विभागाच्या या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच उर्वरित रहिवाशांना आम्ही रोख मोबदला देण्यासाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या काही प्रकल्पग्रस्तांना केडीएमसीच्या बीएसयूपी अंतर्गत कचोरे येथे बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये रेल्वेने घरे विकत घेऊन दिली आहेत. त्यामुळे मंगळवारी ही कारवाई सुरू करण्यात आली असून, आता या प्रकल्पाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

------------------

Web Title: DFCC demolished 73 houses affected by the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.