राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत ठाणे जिल्ह्यात भिवंडीच्या धामणकर नाका मित्र मंडळास प्रथम पुरस्कार
By नितीन पंडित | Published: October 14, 2022 12:51 PM2022-10-14T12:51:01+5:302022-10-14T12:51:26+5:30
या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख पारितोषिक प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे .
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: राज्य शासनाने प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत ठाणे जिल्हा स्तरीय प्रथम पारितोषिक भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्र मंडळाला घोषित करण्यात आला आहे . या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख पारितोषिक प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे .
भिवंडी सारख्या संवेदनशील शहरात सर्व जाती धर्मातील नागरीकांना एकत्र घेऊन हा उत्सव साजरा करीत असताना फक्त धार्मिक उत्सव करून न थांबता गणेशोत्सव काळात रक्तदान,आरोग्य शिबीर,चित्रकला स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा,गणेश दर्शन स्पर्धा,लंगडी स्पर्धा या माध्यमातून विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न धामणकर नाका मित्र मंडळाच्या वतीने केला जातो.
या मंडळाने शासनाने नमूद केलेल्या सर्व घटकांमध्ये सहभाग नोंदविला होता.या गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा जोपासण्याचे कार्य मंडळ करीत असून हा पुरस्कार मंडळासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या सेवा कार्याला व भिवंडीकर जनतेला समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया धामणकर नाका मंडळाचे अध्यक्ष संतोष एम शेट्टी यांनी दिली आहे.
तर या उत्सव काळात शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्या साठी भिवंडी पोलीस परिमंडळ मधील पोलीस अधिकारी कर्मचारी व महानगरपालिका अधिकारी कर्मचारी व भिवंडी शहरातील नागरीकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे .धामणकर नाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"