महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By अजित मांडके | Updated: July 16, 2024 15:43 IST2024-07-16T15:43:44+5:302024-07-16T15:43:58+5:30
सीपी तलाव येथे हे कामगार मागील काही वर्षापासून काम करीत आहेत.

महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सीपी तलाव येथील ठेकेदारकडे कार्यरत असलेल्या सुमारे ५५ कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी ठेकेदाराचा निशेध करीत न्याय मिळावा अशी मागणी केली.
सीपी तलाव येथे हे कामगार मागील काही वर्षापासून काम करीत आहेत. परंतु, शुल्लक कारणावरुन घरी बसविणे, ४ वर्षांचे वार्षिक रजेचा पगार देण्यास टाळाटाळ करणे, क्षमतेच्या अतिरिक्त काम करुन घेणे, कामात अपघात घडल्यास उपचारासाठी टाळाटाळ करणे अशा पध्दतीने अरेरावी सुरु असल्याचे कामगारांचे म्हणने आहे. त्यातही कामागारांना कमी करण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आले. या मध्ये जानेवारी २०२० पासून वार्षिक रजेचा पगार न देणे, फायलेरिया विभागातील कामगारांचा दोन महिन्यापासून पगार न देणे, या बद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्या मुळे नाईलाजास्तव हे धरणे श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कामगाऱ्यांच्या व नागरिकांच्यास आरोग्याशी खेळ मंडणाऱ्या नियमबाह्या ठेकेदार आणि अरेरावी करणारे दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांची पाठराखण करणाºया अधिकाºयांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावर तोडगा काढण्यासाठी संबधीत ठेकेदारांना बोलवण्यात आले आहे. यातून मार्ग काढून त्यांची समस्या सोडविली जाईल.
(तुषार पवार - उपायुक्त, घनकचरा विभाग, ठामपा)