धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 03:57 AM2018-03-11T03:57:01+5:302018-03-11T03:57:01+5:30

मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर एकाच ठिकाणी तिने तंबू ठोकल्याचे पाहून एका जागरूक नागरिकाच्या मदतीने पोलिसांनी तिचे समुपदेशन करून महिलादिनी तिला स्वगृही पाठवले.

Dhuntala girl was found in Thane, with the help of aware citizens and police returned to her home on the next day | धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली

धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली

Next

- पंकज रोडेकर
ठाणे  - मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर एकाच ठिकाणी तिने तंबू ठोकल्याचे पाहून एका जागरूक नागरिकाच्या मदतीने पोलिसांनी तिचे समुपदेशन करून महिलादिनी तिला स्वगृही पाठवले.
नंदिता (नाव बदलले आहे) असे त्या तरुणीचे नाव असून ती वडिलांसोबत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. बारावी सायन्सला असलेली नंदिता हिचा २३ फेब्रुवारी रोजी मराठीचा पेपर होता. त्यामुळे पेपरच्या वेळेत ती सायकल घेऊन घरातून निघाली. सायंकाळ झाली तरी, घरी परतली नाही म्हणून तिच्या वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती कुठेच सापडत नसल्याने अखेर त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी देवपूर पोलीस ठाण्यात जाऊन मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पण, घरातून जाताना ती कोणालाही काही सांगून निघाली नसल्याने आणि तिला कोणीही पाहिले नसल्याने तिचा शोध घेणे पोलिसांना कठीण होऊन बसले होते. त्यातच, एकीकडे सर्वत्र ८ मार्च रोजी महिला दिन साजरा होताना ती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आवारात पोलिसांसाठी सुरू केलेल्या ऊर्जिता हॉटेलजवळ येऊन उभी होती. सकाळी आलेली नंदिता सायंकाळ झाली तरी तेथेच घुटमळत असल्याचे विशाल पाटील नामक जागरूक नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजर केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती गप्पच बसली होती. त्यानंतर, तिने पुण्यात राहणाºया भावाचा पत्ता आणि फोन नंबर दिला. तसेच वडील दारूच्या अधीन गेले असून मातृछत्र हरपले आहे. तसेच आपणास दोन भाऊ असून एक पुण्यात तर दुसरा सैन्य दलात असल्याचे सांगितले. त्यातच, स्वावलंबी जीवनासाठी मैत्रिणीसोबत मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. पण, ती येत नसल्याचे लक्षात येताच आपणच धुळ्यावरून ट्रेनने मुंबई गाठली. काही दिवस ब्रह्माकुमारी आश्रमात घालवले. त्यानंतर, ठाण्यातील ऊर्जिता हॉटेलजवळ येऊन थांबल्याचे तिने सांगितले.
तिच्या भावाशी संपर्क साधून त्याला तिची माहिती दिली. त्यानुसार, शुक्रवारी तिला तिचे पालक आणि देवपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील व त्यांच्या पथकाच्या स्वाधीन केले. शुक्रवारी ती स्वगृही परतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सांगितले.

स्वावलंबी जीवनासाठी

नंदिता (नाव बदलले आहे) असे त्या तरुणीचे नाव असून ती वडिलांसोबत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील दारूच्या अधीन गेले असून मातृछत्र हरपले आहे. तसेच दोन भाऊ असून एक पुण्यात तर दुसरा सैन्य दलात आहे.
मात्र, तिला स्वावलंबी जीवन जगायच्या उद्देशाने तिने घर सोडले आणि मुंबईतून ठाण्यात आली.

Web Title: Dhuntala girl was found in Thane, with the help of aware citizens and police returned to her home on the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.